Status in Marathi

2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook

New Alone Angry Attitude Birthday Breakup Brothers Cheat Crush Emotional Festivals Friends Funny Good Morning Gym Happiness Heart Touching Independence Day International Friendship Day Life Love Mahakal Miss U Motivational Rain Sad Selfish Single Sisters Sorry Thanks
 

आयुष्यात तुमची रोजची जडणघडण खुप सुंदररित्या होणं गरजेच आहे, आपल्या आसपासच्या परिसरात चाललेल्या प्रत्येक घडामोडींना तुम्ही कसं सामोरे जाता हे सर्व गरजेचं असतं. त्या त्या ठराविक परिस्थीतीतं तुमची वागणुक पुढील भविष्यात तुमच्यातल्या माणुसपणाची गोष्ट ठरते. त्यामुळे भान राखून गोष्टींना सामोरे जात चला.

किरण पवार (अंशु)

तिरस्कार हा एकतर मनाला पेटून उठवण्याचं कार्य तरी करू शकतो किंवा तो मनाला नकारात्मक बुद्धीने वागायला प्रवृत्त तरी करू शकतो; माणसाच्या वृत्तीत सारेच गुण सामावलेले असतात तो कधीतरी चुकून एखाद्याचा तिरस्कार करू शकतो पण मग या केलेल्या तिरस्कारातून आपणच इर्षेने पेटून नव्याने ध्येय गाठण्याची प्रेरणा स्वत:ला दिली पाहिजे.

किरण पवार (अंशु)

जेव्हा धैर्य एका टप्प्यावर भरपुर खचत तेव्हा इतरांपाशी व्यक्त व्हायला जमत नसेल तर स्वत:शीच व्यक्त होणं अधिक गरजेच असतं. आपल्या डोळ्यासमोरील परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वत:च्या आधीच्या जिवणात तुम्ही सामोऱ्या गेलेल्या संकटांची आठवण करून त्यांना स्वत:पाशी व्यक्त करा, कटू आठवणींना उराशी कवटाळून रडा हवं तर पण त्यातुन भुतकाळात तुम्ही सावरला होतात हेही पुढे स्वत:ला आठवण करून द्या. आणि हळूहळू स्वत:लाच खंबीर करत एकेक दिवस मनाचं धैर्य वाढवायला लागा.

किरण पवार (अंशु)

अंदाज बांधता येणे फार गरजेचे असतात. मात्र दरवेळी बांधलेले अंदाज बरोबरच येतील याची खात्री नसते. त्यामुळे थोडसं संयमाला जपत, ध्येयाच्या दिशेने अंदाज घेत चालत रहायचं.

किरण पवार (अंशु)

तुमच्या मनाच्या धैर्यशील भावनांवर कायम ठाम रहा. मनाचं धैर्य हेच उभ्या आयुष्यात उत्तम जगायला शिकवतं.

किरण पवार (अंशु)

नकारात्मक लोकांच्या प्रश्नांची कधीही उत्तरे देत बसू नका, स्वत:ला इतरांना समजावत बसू नका; ही वेळ कमखर असते. ती अशा लोकांना तुमच्या यशाची गोडी चाखवूनच त्यांची उत्तरे त्यांना देते. कारण टिका होत असताना आपण शांतपणे आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केलेलं असणं अधिक महत्वाचं.

किरण पवार (अंशु)

भिती आणि मनात निर्माण झालेली समस्या किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची अस्थिरता या दोन गोष्टी मुळ पैलू असतात ज्या एखाद्या दिशेच्या ध्येयाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे भिती वाटल्यानंतर ती का वाटते आणि त्यावरील पुढील मार्ग काय असावेत यावरदेखील विचार करता यायला हवेत.

किरण पवार (अंशु)

तुम्ही जेव्हा प्रयत्न करायला सुरूवात करता तिथेच तुम्ही खरतरं जिंकता कारण अनेक लोकांना प्रयत्नही नको असतात. तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा पहिला प्रयत्न जिथे करता तिथे अनेक लोक तुमच्या चुकांची वाट शोधत टिंगलटवाळीसाठी विषय गोळा करत बसतात परंतु तुमचं लक्ष, पुढच्या वेळी नेमकी ती गोष्ट अधिक योग्य दिशेने कशी करता येईल याकडे लक्ष असलं पाहिजे.

किरण पवार (अंशु)

आपण सहसा एखाद्या अपयशावर तितक्या प्रगल्भपणे चर्चा किंवा विचारविनिमय करतच नाही. जे आपल्या अनेकदा पुढे सातत्याने येत जाणाऱ्या अपयशांच कारण ठरू लागतं. आपण नेटकेपणाने आपल्या अपयशाला जाणून घ्यायला शिकलो की पुढील मार्ग सहजसाध्य होतात.

किरण पवार (अंशु)

तणावपूर्ण वातावरण हळूहळू तुमच्या व्यक्तीमत्वाला अधिक खुलवत जातं. प्रथमदर्शनी आपल्याला ताणतणाव नकोसाच असतो, सर्वांच्या बाबतीत हीच गोष्ट घडते. परंतु तणाव नकोच म्हणून एखाद्या दिशेची वाट न निवडणं हे उत्तर असू शकत नाही. प्रत्येक अनुभव प्रथम असतो, दुसर्‍या वेळी आपण मनाची स्थिती थोडी अधिक घट्ट बनवतो... तिसऱ्या चोथ्या वेळेत तर आपण समोर येणाऱ्या परिस्थितीला कसं सामोर जायचं याची मनोमन खंबीर तयारी करून ठेवलेली असते. त्यामुळे अगदी निर्धास्तपणे नव्या दिशा, नव्या वाटा चालण्याचा प्रयत्न करावा.

किरण पवार (अंशु)

कोणतीही सवय जी तुम्ही शरीराला लावता अथवा मनावर बिंबवता त्यातून प्रभावीपणे एका दिशेची वाटचाल घडत जाते. त्यामुळे दैनंदिन जीवण जगताना स्वत:च्या छोट्याशादेखील गोष्टींची नोंद स्वत:च्या विचारांमधे घेऊन पुढे वाटचाल करत रहा.

किरण पवार (अंशु)

दैनंदिन आयुष्यात सर्वच क्षेत्रात ब्रेक हा गरजेचा असतो. तुमचा मेंदू सलग तासनतास एखादी गोष्ट पचवत जरी असला तरी त्याला ते सार आत्मसात करण्यासाठी काही निवांत क्षणाचीही गरज असते.

किरण पवार (अंशु)