2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
सहसा कधीही इतरांविषयी मनात पुर्वाग्रह निर्माण करू नका. व इतरांची निंदा करण्याचा मानसही कधी जोपासू नका. ध्येयाप्रती स्वत:च्या चांगलेपणाबद्दल विचार करत पुढे चाला. ध्येय मिळेपर्यंत सहसा प्रचंड स्वत:बद्दल चांगल, वैचारिक व विवेकी सद्भावना ठेवून प्रयत्न करत चला. तुमच्या सर्व सकारात्मक उर्जेचा एक दिवस यशाच्या शिखरावर गौरव होणार याची खात्री बाळगत चला.
मनात कोणतेही आंतरिक कलह सुरू राहू देऊ नका, भावनांना व्यक्त करून मोकळे व्हा. त्याखेरीज तुम्ही जिवणात पुढच्या पायरीवर यशस्वीपणे जाऊ शकत नाही.
अनेकदा आपलं बोलण्यातली लय ही आपल्या शब्दांपेक्षा अधिक प्रभावी ठसा समोरच्या व्यक्तींवर उमटवत असते. त्यामुळे अनेकदा असं घडू शकतं की, तुमच्या शब्दश: अर्थांना चुकीच्या पद्धतीने वा गैरसमजाने समोरचा समजून घेईन. तेव्हा अधिक वाईट न वाटता व रागात न येता तुमच्या संवादातील योग्यता पुन्हा एकदा पटवून देण्याचा प्रयत्न करा. हे जग नात्यातील वादांमधे गुरफटून रहायला खुप छोट आहे. व मुळात नाती जपलीत की मानसिक स्वास्थ्य आपोआप स्थिर रहायला मदत होते.
बंडखोरी ही संकल्पना चुकीची वा ती नेहमी चुकीची असावी असं नाही. तुम्ही स्वातंत्र्यासाठी, हक्कांसाठी, मुलभूत गरजांसाठी वा अशाच खऱ्या गरजेच्या व अत्यावश्यक गोष्टींसाठी जेव्हा बंडखोरी करता तेव्हा ती उपयुक्त असते. ती शिक्षणाकरता असो, कमी वयात लग्नाला विरोधापासून असो...!!
वैयक्तिक जडणघडणीत सभोवतालच्या घटकांचा बराचसा सहभाग असतो. लहानपणापासून तुम्ही कशा प्रकारच्या वातावरण वाढता हे तुमच्या सहसा हातात नाही व नंतर तुम्ही पुर्वपरिस्थितींनुसार सध्याची मन:स्थिती बदलूही शकत नाही. परंतु एकमात्र करू शकता ते म्हणजे स्वत:साठी नव्याने नव्या विचारांची देवाणघेवाण सुरू करा व रोज सकारात्मक रहा.
हे अमुकतमुक असचं आहे किंवा आपल्यासारख्यांसोबत असचं होत राहतं वगैरे जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा नकळतपणे स्वत:च्या ईच्छाशक्तीवर तुम्ही बंधन आणत असता. ही बंधन नकळतपणे रूजत गेली तर नंतर तुम्ही सारंकाही पुर्वग्रह लावत स्वत:ला बंदिस्त करून जगता व चुकीच्या मार्गात अडकत जाता, त्यामुळे स्वत:च्या ईच्छाशक्तीवर विश्वास ठेवत कायम स्वत:ला नव्या पैलूंच्या शोधात ठेवत चला व स्वत:च्या ईच्छाशक्तीवर बंधणं लावू नका.
तुमच्या स्वत:बद्दलच्या पुर्वधारणांना कधीच 100% सत्य मानून चालू नका. बदल हा जिवसृष्टीचा नियम आहे, तुम्हीही टप्प्याटप्याने बदलत नवीन काहीतरी आत्मसात करत आज एका ठराविक स्थितीत आला असालं. तेव्हा मनाला कायम खंबीर ठेवा. तुम्ही जर काही धारणा करून स्वत:ला एखाद्या चौकटीत अडकवले तर ती चौकटच तुमची अंतीम रूपरेषा बनून जाते, त्याबाहेर पंख पसरवण्याची व त्यापेक्षा प्रखर मोठ्या ध्येयाकडे झेप घेण्याची क्षमता आजमावून पहात चला.
मनात कधीच दुजाभाव वा तुलनात्मक संकेतांची निर्मिती होऊ देऊ नका. हे दोन्ही घटक तुमच्या स्वत:तील धैर्य व संयमाला संपवून आत्मविश्वास कमी करण्याचं कार्य करतात, त्यामुळे स्वत:वर लक्ष द्या. इतरांच्या कोणत्याही कृतीबद्दल नेहमी आदरभाव बाळगून चाला इतकचं.
इतरांची प्रत्येक निवड ही तुमचीदेखील असावी असं गरजेच नाही. केवळ इतर लोक त्या अमुकतमुक ठराविक मार्गानेच यशस्वी झालेत तर आपणही त्याच दिशेने का जाऊ नये? हे ठरवणं म्हणजे पायावर दगड मारणं. कारण इतरासाठी घडलेले प्रसंग व घटना अगदी भिन्न स्वरूपाच्या असू शकतात ज्या वरकरणी तुम्हाला स्वत:च्या दृष्टीने स्वत:च्या परिस्थितीसारख्या भासू लागतील; परंतु संयम, जिद्द, चिकाटी व कणखरपणे ध्येयाचा पाठलाग करणं हा मार्गच कायम मुलभुत दिशादर्शक ठरणार हे लक्षात घ्या.
जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
कृत्रीमपणाच्या जाणिवेतून बाहेर पडा, तुम्ही काही आत्मसात करत असालं, ध्येयाकडे वाटचाल करताना काही विशिष्ट पद्धती वापरत असालं, कोशल्य विकसित करत असालं तर अशावेळी ते करताना मनातुन सारंकाही ध्यानात घ्या. मनोभावे जर गोष्टी करालं तर त्या तडीस जातातचं.
तुमच्या मनात जर राग, द्वेष वा सतत एखाद्या गोष्टीचा संकोच साचून राहू लागला तर तुम्ही तुमच्या शारिरिक आरोग्याला नकळत हानी पोहोचवू लागता व त्यातूनच मानसिक खच्चीकरणही व्हायला सुरूवात होते त्यामुळे सहसा आनंदी, मनाला तेजस्वी व शक्य तितकं साधेपणाने जपत चला बाकी गोष्टी सर्व आपोआप चांगल्या घडत राहतील.