Latest WhatsApp Status

Latest Status for WhatsApp, Instagram, and Facebook

 

प्रत्येकासाठी वैयक्तिक आयुष्यात क्रिएटिव्ह स्पेस हा गरजेचा असतो. तुम्ही कोणत्याही ध्येयाप्रती प्रेरित असालं, तुमची दिशा व योजना आखलेल्या असतील... सारंकाही अगदी शिस्तबद्ध असेलं व अशातचं या क्रिएटिव्ह स्पेसचीसुद्धा गरज असते. यामधे तुम्ही स्वत:ला योग्यपणे निरखून स्वत:साठी नेहमी सजग रहायला शिकता.

अंशुलिखित

तुमचे गट्स अर्थात तुमचा धैर्यपणा, हिम्मत ही गोष्ट अतीशय महत्त्वाची ठरते. एखादा निर्णय घेताक्षणी, एखाद्या ठिकाणी अडचणीत जरी पडू लागलो तरी हिमतीने मी सर्व सारुन नेईन हा ठामपणा दाखवणे, या गोष्टीच तुम्हाला सर्वार्थाने आयुष्याच्या इतर कोणत्याही प्रचंड संकटातून वाचवत असतात. त्यामुळे गरजेच्या वेळी गट्स बाळगले पाहिजेत थोडक्यात हिम्मत बाळगली पाहिजे.

अंशुलिखित

तुमची म्हणवली जाणारी हक्काची माणसं गरजेच्या मुख्य ठिकाणी मदतीला आली पाहिजेत. वेळ निघून गेल्यावर किंवा अगदी तोंडावर संकट उभं टाकल्यावर मदत करतो, मदत केली असं करणारी माणसं तुम्हाला कमकुवत बनवतात. जी माणसं तुमचा पाया मजबूत करण्यात मदत करू लागतात की खरी तुमची हक्काची माणसं.

अंशुलिखित

तुमचा स्वभाव अनेकदा तुमच्या आयुष्यातले संकटे, मार्गात येऊ घातलेले अडथळे सहजरित्या नाहीसे करतो... कारण स्वभावात जेव्हा वेगळ्या दृष्टीकोनाची अन सहजतेने एखादा विषय हाताळण्याची कला जी अंगात मुरल्या जाते तीच कला मुळात जगण्यात गरजेची असते. त्यामुळे रोजच्या जिवणात स्वभावाला स्थैर्य देण्याच कार्य करा बाकी आपोआप सर्व ठीकचं होईल.

अंशुलिखित

तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.

अंशुलिखित

संयमाची परीक्षा अलीकडच्या काळात खुप गरजेची ठरते, इथे पावलापालांना लोकांना तुमच्याकडून काहीतरी सर्वोत्कृष्ट हवं असतं पण भले स्वत:ची आयुष्याची काही कार्ये का नसेनात. त्यामुळे लोकांना तुम्हाला रोज ट्रोल करू देत चला, तुम्ही धीरानं त्या शब्दांना, त्या अवमानांना घेत एक दिवस यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचून त्यांना उत्तर द्या.

अंशुलिखित

भानावर रहात चला. हे यासाठी कारण अनेकदा आपल्या आजुबाजुला वावरणारे लोकं तुमचा गोड बोलून किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडून अशा पद्धतीने गळा चिरून निघून जातात की तुम्हाला, "अ" देखील करायची मुभा मिळत नाही. थोडक्यात हे गोचिड किंवा लीचप्रमाणे लोकं असतात ते चिकटतात अन रक्त पितात. रक्त अर्थात तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमचं खच्चीकरण वेगवेगळ्या योजनांनी करतात. अन वेळ गेल्यावर आपल्या आयुष्यात नैराशाच्या झळा उरतात, तेव्हा वेळोवेळी सावध रहायला शिका.

अंशुलिखित

हेवेदावे तेव्हाच करावे जेव्हा अगदीच अती टोकाची परिस्थिती समोर असेल. अन्यथा नको तिथे हेवेदावे करत बसलात तर वेळ, क्रोध, मनातलं शल्य या साऱ्याच भावनांचा आवेग शुन्य होऊन आपल्या पदरी निराशा पडते.

अंशुलिखित

भरकटू नका. बऱ्याचदा भविष्यात कायमस्वरूपी स्थैर्य देणाऱ्या गोष्टी या सुरूवातीच्या टप्यांवर प्रचंड वेळ घेत राहतात; त्यावेळी अशा परिस्थितीत मन:स्थिती अगदी एकरूप, संघटित व घट्ट प्रमाणात एकवटून ठेवावी लागते. टिकवलेल्या मनाच्या धैर्याचा, आपल्या दिशेचा, आपल्या योजनांचा बांध हा फुटू द्यायचा नसतो. एक, दोन प्रयत्न वा योजना जरी चुकल्या तरी दिर्घ ध्येयाकडे जाणारी योजना ही सखोल व्यापक असते इतकं लक्षात ठेवा.

अंशुलिखित

तुमचा वैयक्तिक अनुभव वेगळा असू शकतो, एखाद्याच्या वाट्याला नवा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही सल्यामधे एखाद्याला नाऊमेद करू नका. परंतु वास्तविकतेची बाजू समजावणं काम असतं ते आवर्जून करा पण सल्ला व त्याच्या दोन्ही बाजू स्पष्टपणे मांडा केवळ नकारात्मकता नको इतकचं.

अंशुलिखित

करायचं तर भारीच करायचं या भ्रमात जगणाऱ्या लोकांच आयुष्य आळस खाण्यात, मनोरंजन जगण्यात, इतरांविषयी बोलण्यात अधिक प्रमाणात निघून जातं. त्यांच्या हेही लक्षात येत नाही की या भ्रमात राहून ते काहीच करत नाहीयेत. प्रत्येकजण पाच वर्षांनी एक हुकमी एक्का फेकून जिंकणारं नशीब नाही घेऊन येतं; या आयुष्याच्या खेळात "प्रयत्न व चुका" याच तत्वावर सारंकाही आधारलेलं असतं.

अंशुलिखित

तुम्हाला अनेकदा याची जाणीव होत नाही पण सहसा सोशल मीडिया तुमच्या भावनांना फार प्रमाणात नुकसान पोहचवतं. ते एकप्रकारे तुमच्या भावांनाना नियंत्रीत केल्याप्रमाणे कार्य करत राहतं. त्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यातला संयम गमावतो, आपण स्थैर्य गमावतो. तर यासाठी सोशल मिडीयाची हाताळणी हि काळजीपूर्वक करणं फार गरजेचं आहे.

अंशुलिखित

कामाशी मग्न होता आलं पाहिजे. अनेकदा माणुस किंचितशा केलेल्या कामाचा अतीपणा करून स्वत:च्या साऱ्याच क्षमतांना कमी करू लागतो. त्याच्या नकळत त्याच्यात आळस व सोबतच अहंकाराचे प्रमाण वाढू लागते. थोडं जरी केलं तरी त्याचं त्याचा क्रेडिट हवंहवंसं वाटू लागतं. अशी माणस काळाबरोबर आपोआपच लुप्त होतात. त्यांची दखल इतिहास घेत नाही

अंशुलिखित

मनात फारशी खदखद वा दुख: लपवून ठेवत चलू नका अन्यथा एखाद्या वेळी जेव्हा साचलेलं सार बाहेर पडायला लागतं त्यावेळी ते शक्यतो इतर व्यक्तींवर रागाच्या स्वरूपातचं बाहेर पडतं अन अशाने नाती दुखावली जातात अन माणसं दुरावतात.

अंशुलिखित

जगताना मनाला पुर्णत: व्यापून जगता आलं पाहिजे. ज्या ध्येयाकडे लक्ष आहे त्याकडे पाहताना नजर अगदी स्पष्ट हवी. एकदा स्पष्ट कल्पना नजरेतून योग्य अवतरली की मग पुढील प्रवासाचा रस्ता टप्याटप्याने आखता येतो.

अंशुलिखित

तुम्ही एखाद्याच्या चुकीच्या निर्णयात होकार देऊन अथवा तुम्हाला न कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टीला सहजचं हो म्हणून स्वत:वर हळूहळू एकप्रकारे इतरांच्या व्यक्तींची बंधणे लावून घ्यायला सुरूवात करत चलता. अशाने कधीकधी परिस्थिती गंभीर दिशेला गेल्यावर तुम्हाला पश्चाताप होऊ लागतात; त्यामुळे वेळीच योग्य तिथे गरजेला नकार दर्शविला जाणं गरजेचं आहे.

अंशुलिखित

तुम्ही ध्येय मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडला पाहिजे, अनेकदा तणावात काम करण्याची तयारी स्वत:च्या मनाला खंबीरपणे सांगून केली पाहिजे, अनेकदा गंभीर स्थितीत मनाला शांत ठेवून योग्य निर्णय घेता आले पाहिजेत अन हे सर्व जमण्यासाठी दिवसेंदिवस मनोधैर्य सक्षम ठेवण्यावर भर दिला पाहिजे.

अंशुलिखित

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरता जिद्दीने कष्ट घेत असताना तुम्हाला तुमच्या "एकाग्रतेच्या" क्षमतेवर उत्तमपणे प्रभुत्व मिळवता आलं पाहिजे. एकाग्रता असणं अर्थातच त्या कार्यात मग्नता अन त्यातले संपुर्ण आराखडे नाजुकपणे टिपून आपल्यात साठवण्याची क्षमता अधिक हवी. खरतरं एकाग्रतेने तुमच्या कार्यातल्या अनेक बाधाही सहजपणे नष्ट होतात. अवांतर वाचण करणं, आवडत्या गोष्टी करणं यातुन एकाग्रता वाढते.

अंशुलिखित

आयुष्य या चालू क्षणांमधे अधिक प्रगल्भपणे सूरू असायला हवं. भुतकाळातल्या चुका चघळत न बसता चालू सद्यस्थितीवर अधिक तुमचा फोकस ठिकपणे असायला हवा.

अंशुलिखित

अनेकदा जर तुम्ही इतरांच्या चुकांना ग्राह्य धरत गेलात तर पुढे ते लोक सबंध तुमच्या व्यक्तीमत्वाला ग्राह्य धरू लागतात. अन अशानेच मग नात्यांच्या लागेबांध्यात तफावत येऊ लागते. त्यामुळे वेळीच गरज पडेल तिथे एखाद्याला सावध करणं फार महत्वाचं असतं.

अंशुलिखित