44 Life Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो.. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही.
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.
वेळ आल्यावर सगळेच बदलतात पण वेळ कसलीही आली तरी जे बदलत नाहीत, जे आपल्या सोबत असतात तेच खरे आपले सोबती असतात.
शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी त्यामध्ये जमीन- आसमानाचा फरक असतो. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात.
समोरच्याला आदर देणे ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून आदर मिळविणे हा सर्वात मोठा सन्मान असतो.
आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.
खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका… स्वत: चांगले व्हा. कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
दु:खाशी दोन हात केल्याशिवाय सुख मिळत नाही.