2127 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
रोज नव्या क्षणात नव्याने भरारी घेता आली तर साऱ्या अडचणी नगन्य वाटून जातात. त्यामुळे प्रयत्न छोटे, सहज, साधेपणातील जरी असले तरी त्यांमधे सातत्य असणं फार गरजेच ठरतं. सातत्याच्या पर्यायाशिवाय तुमच्याकडे असलेल्या जिद्दीला फार वाव मिळणं अशक्य समीकरण आहे.
शब्दांच्या मधलं बरचं काही समजून घ्यावं अशी अपेक्षा असते, माणूस निसर्गत: तेवढा चमत्कारिक नाहीये, त्यामुळे मला वाटतं मनात असेल ते बोलून मोकळं व्हावं. उगाच एखाद्याच्या मनावर टांगती तलवार फिरवणं जरा चुकीचचं. त्यामुळे संवादांमधून नात्यांमधे स्पष्टोक्तेपणा आणणं फार गरजेच आहे. आपण अनेक नात्याबद्दल अनेकदा समजुन न घेता, उघडपणे न बोलता जे आतल्या आत दाबून ठेवतो त्या गोष्टींनी नाती संपुष्टात येतात कारण आपल्यात संशयाचा अकारण घेरा अशाने वाढत जातो.
जिवणात प्रत्येक दिवशी सातत्याने आपल्या कौशल्यावर, आपल्यातल्या चांगल्या गुणांवर अधिक कार्य करत पुढे चालत रहा. दररोज आपलं कसबं, आपली कला, आपली बुद्धी, आपल्यातल्या चांगल्या गुणांची इतरांना माहिती द्यायची किंवा ते आपल्यात आहेत हे दर्शवायची गरज नसते. इतरांना नकारात्मक बोलून घेऊ द्या पण ऐनवेळी जिथे एखादी स्पर्धा असेल, तुम्ही एखाद्या चांगल्या दर्जाच्या मंचावर स्वत:ला दर्शवत असालं अशा ठिकाणी मात्र रोजच्या स्वत:वर केलेल्या कामाची प्रचिती आवर्जून दर्शवा आणि इतरांना चकीत करून टाका. शेवटी रोज केवळ कृती न करता वायफळ बडबड करणारे अंतीमत: टाळ्या वाजवत राहतात. आणि आपल्याला जग जिंकायचं असतं.
अनेकदा संयमाचा बांध फुटून आपल्या मनावर एक ओझं निर्माण होतं, ते सर्वच बाजुंनी येतं. वयाच्या तरूणपणात असालं तर सहसा करियर निवडी, तुमच्यावर कधीकधी ऐनवेळी आलेल्या जबाबदाऱ्या, कधीकधी काही मनाविरुद्ध घ्यावे लागलेले निर्णय, सारे अगदी राक्षसाप्रमाणे घातक आठवणी बनून डोळ्यात उभे राहतात. अशावेळी अगदीच स्वत:ला खमकं समजून ते आतल्या आत साचवण्याचा प्रयत्न करू नका. माणुस मनाने मोकळा व्हायला हवा, तेव्हा स्वत:तील ओझं आलेल्या विचारांना रडून, एकट्यात रडून का असेना पण एकदाचं मोकळं नक्की करा. त्यानंतर तुम्ही नव्याने स्वत:ला योग्य विचारांच्या दिशेत घेऊन जाऊ शकालं.
नाण्याला दोन बाजू असल्या तरी प्रत्येकच परिस्थितीत दुसरी बाजू तपासायची गरज नसते; अथवा जिथे अधिक अडचणी, संकट विनाकारण पदरात पडणार आहेत, अशा ठिकाणी स्वत:चा वेळ आणि स्वतःची कुवत वाया घालवणही बरोबर ठरत नाही.
आयुष्याला मिळणारं उधाण हे जरास अडचणीत टाकतं कधीकधी, पुढचा रस्ता अचानक ओढावलेल्या उधाणाने जास्तीचाच कठीण झाला याचीही मनात धाकधूक होते, परंतु अशावेळी विचारक्षमतांना आजमवायची खरी गरज निर्माण होते, एकदा का सारे पर्याय व्यवस्थित शोधले की सारकाही पुन्हा स्थिर होऊन जातं.
दुसऱ्यांच्या चुकीमुळे जर तुम्हाला कधी एखाद्या अनुभवात पश्चाताप करायची वेळ आली, ते काम इतरांच्या दोषांमुळे चुकलं तर तुम्ही स्वत:च्या प्रामाणिक प्रयत्नांना दोष देऊ नये. नव्याने मार्ग शोधून आपल्या प्रयत्नांना ध्येयाकडे पुन्हा न्यावं.
विचारांनी मन गजबजलेलं असतं तेव्हा नव्या विचारांकडे लक्ष द्यायची तसदी कुठलाच व्यक्ती घेत नाही; भिती असते, प्रश्न असतात, कंटाळा असतो आणि मुळात काय करता येईल हे संकट उभं असतं. अशावेळी जुन्या विचार, आठवणी यांच्याकडे पाठ फिरवून नव्या कल्पनेत आणि नव्या विषयात रममाण होता आलं की सारे प्रश्न मिटतात.
आपण सतत एका संघर्षाला टाळतो तरी किंवा ते नाकारतो तरी, तो संघर्ष असतो स्वत:ला स्विकार करण्याचा. आपण माणुस म्हणुन 100% परिपूर्ण असावं हा अट्टाहास चुकीचा आहे. त्यामुळे आपल्यामधे गुण-दोष आणि काही इतरही बाजू आपल्यामधे समाविष्ट असणार आहेत. त्यामुळे आपण आपल्या स्वत:च्या संघर्षावरही विजय मिळवतं शक्य ते बदल करावेत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे चालावं.
जिंदगीत एखादी गफलत होते, एखादा गैरसमज होतो, एखादी व्यक्ती दुरावते तर कधी एखादं नातं, पण शेवटी सुर्याला जसं अस्तापर्यंत जाऊन पुन्हा नव्याने यायचं असतं; आयुष्याची घडी तशीच बसवावी लागते अगदी नाईलाज असला तरी. काही निर्णय गंभीर आणि मन खंबीर; स्वत:ला तसं बनवावं लागतं.
आज जग फार पुढे चाललयं, सारी माहिती गुगलवर झटक्यात मिळते. अशात एखाद्या नवख्या विषयावरची माहिती एखाद्या क्षणी एखाद्या व्यक्तीसमोर आपल्याकडून चुकीची सांगितल्या गेली किंवा चुकलीही समजा तर हरकत नाही; त्यात कमीपणा वाटून किंवा नंतर एखाद्या क्षणी आपल्यालाही कसं सार ठाऊक असतं, आपल्याही ते येतं असं दाखवायची गरज नसते. प्रत्येकाला सर्वच विषयातलं जगभरचं सारच ज्ञान असावं असं गरजेच नाहिये. आणि अनेकांना स्वत:चंच खरं असंही म्हणायची सवय असते तर त्यांना दुर्लक्ष करायचं.
जर तुमच्यामधे धैर्यच नसेल तर सारकाही व्यर्थ ठरणार आहे हे लक्षात ठेवा; आणि धैर्य, हिम्मत या गोष्टी जन्मत: उपजत याव्यात हा अट्टाहास नसावा. आयुष्यात जडणघडण ज्या दिशेत होत जाते तेव्हांच्या अनुभवांमधून माणुस स्वत:ला कणखर बनवत जात असतो. तेव्हा धैर्य निर्माण होतं.