2263 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
माणुस म्हणुन स्वत:ला सुधारण्यासाठी कायम प्रयत्न करत रहा. जग तुम्हाला त्याकरता कायम लक्षात ठेवत राहिलं. परिपूर्ण कोणीच नसतो, मरेपर्यंत ही धारणा स्वत:ला परिपक्व करण्यासाठी मनात तेवत राहिली पाहिजे.
चारही दिशांना अंधार दाटू लागल्याच जाणवत असेल, पुर्णत: हतबलता येत चालली असेल, तुम्ही खचत चालला असालं तर अशावेळी शक्यतो अवांतर वाचनाचा सहारा स्वत:ला रिफ्रेश करण्यासाठी आवर्जून घ्या. अथवा पुर्णत: स्वत:च्या योजनांना तात्पुरता आराम द्या. निश्चिंत व्हा, "जियेंगे तो ओर भी लढेंगे" या उक्तीप्रमाणे विश्रांतीच्या काळात असं बलाढ्य मन तयार करा की पुढील घौडदौड चांगली प्रभावी झाली पाहिजे.
तुम्ही स्वत:ला ध्येयाप्रती वाहून दिलेलं असताना अनेकदा तुम्हाला मनाला प्रेरणादायी व उत्साहित ठेवावं लागतं. मन प्रसन्न, शांत व ध्येयाप्रती तितकचं जुजबी विचारांच होतं जाईल याची खातरजमा स्वत:शी संवाद साधून करावी लागते.
तुम्ही इतरांच्या सुचनेने वा विचारांनी स्वत:ला त्या दिशेत वागायला प्रवृत्त करणं चुकीचं आहे. तुम्ही इतरांना स्वत:ला वैचारिकरित्या प्रोत्साहित करण्याची संधी देत राहिलात तर कोणीही सहजपणे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अधिराज्य गाजवू शकतं.
गुणवत्ता जन्मजात असावी लागते असं काही नसतं. तुम्ही तुमच्या दैनंदिन जडणघडणीत कशा पद्धतीने स्वत:ला आकार देत जाता त्या गोष्टी भविष्यात तुमची गुणवत्ता ठरवतात. छोट्याछोट्या मुद्दयांचे विचारदेखील तुमच्या जडणघडणीत भर टाकत असतात.
अनेकदा आपण केलेल्या चांगल्या गोष्टी एखाद्या पडत्या वळणावर आपल्याला छळू लागतात. आपल्या मनात न्युनंगड तयार होऊ लागतो, आपण स्वत:ला आणखीच कमी लेखू लागतो; असं न होता आपण जुन्या चांगल्या केलेल्या गोष्टींवर विचारविनिमय करत पुढे एक पाऊल सकारात्मक विचाराने उचललं पाहिजे.
दृष्टिकोण फार स्पष्ट ठेवा, आत्मविश्वास आपोआप वाढत राहिलं.
स्वत:ला सावरता येणं हे महत्वाचं. तुम्हाला यश मिळण्याआधी कित्येक ठेचा लागतील त्यातून दरवेळी नवे अनुभव, नवे विचार, नव्या कल्पकतेचा प्रवाह तुमच्यामधे नकळत का होईना तयार होत असतो. तुम्हाला हा प्रवाह हेरता येणं गरजेच असतं. आणि त्याच प्रवाहाला आपल्या ध्येयाकडे जाण्याच्या मार्गातलं साधणं बनवायचं असतं.
गोष्ट लहान वा मोठी कशा पद्धतीची जरी असली तरी आपण किती आत्मियतेने त्या गोष्टीला निभावतो हे महत्वाचं ठरतं. त्यामुळे अहंकार न येऊ देता, सर्व बाबतीत "विनम्र राहणं" फार जिकारीचं व यशस्वी बनून राहण्याचं एकमात्र टॉनिक असतं.
स्वत:च आत्मपरीक्षण काही ठराविक नियमांच्या आधारे करायचं असतं. त्यासाठी आवश्यक ते तर्क, नियम, कटीबद्ध शिस्त वगैरेंची परिसिमा स्वत: ठरवून योग्यरित्या त्या दिशेत अवलंब करत आत्मपरीक्षण करावे.
अनेकदा एखादा व्यक्ती तुम्ही पाहता आणि अनुभवल्यावर कळतं की हा स्वत:च्या चुका कधीही न स्विकारणारा माणुस आहे. भलेही तो फारसा अहंकारी नसतो पण तो चुका कधीच स्विकारत नाही. तेव्हा यावर एक म्हणणं इतकंच की जिथेकुठे जिथेकधी तुमचा मित्र, नात्यातील जवळचा व्यक्ती चुकत असेल त्याला वारंवार सांगत चला. भलेही त्याला त्या क्षणी ते पटणार नाही. पण भविष्यात त्यालाही या गोष्टींची जाणिव होईलच.
पुर्वाग्रह अर्थात एखाद्या गोष्टीबद्दल मनात निर्माण केलेला ठराविक दृष्टीकोन, तर मुद्दा असा की पुर्वाग्रह बांधणं व त्यावरून पुढील निर्णय निर्माण करतं हे गणित थोडसं चुकीचं आहे. तुम्ही अनेकदा स्वत:च्या क्षमता, जिद्द, प्रयत्न, काल्पनिकता न वापरता इतरांच्या तुमच्याबद्दल झालेल्या प्रतिमेला खरं समजून स्वत:च्या यशात खोडा मारून घेत असता. अनेकदा असे पुर्वाग्रह समोरच्याबद्दल लावूनही तुम्ही नाती, आपुलकी गमावून इतरांना गृहीत धरू लागता.