Status in Marathi

2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook

New Alone Angry Attitude Birthday Breakup Brothers Cheat Crush Emotional Festivals Friends Funny Good Morning Gym Happiness Heart Touching Independence Day International Friendship Day Life Love Mahakal Miss U Motivational Rain Sad Selfish Single Sisters Sorry Thanks
 

जिद्दीला जोपासत राहणं खरं अधिक कौशल्याच काम असतं. जिद्द एकदा तयार झाली की तिथून पुढे तिची आस, तिचा टिकाव, तिचा संघर्षातील न होऊ देणारा पाडावं व त्या जिद्दीलाच सर्वस्वीपणे वाहून घेतलेला सर्वसमावेशक दृष्टीकोन हे सारंकाही तुमच्या ध्येयाप्रती असलेली एकत्र सांगड घालून विजयाच्या कार्यात मोलाचा वाटा बजावतात.

अंशुलिखित

आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी सराव, सततची मेहनत आणि जिद्द या गोष्टींची गरज लागतेच. शिवाय तुम्ही तुमच्या दृष्टीकोनात सहजता आणायला हवी. अनेकदा ध्येय फार अवघड आहे, मी इथपर्यंत पोहोचेलचं का वगैरे करुन आपण नको तितका त्या गोष्टीचा धसका घेऊन कुठेतरी एक पाऊल नकळत आपलचं खच्चीकरण करत असतो. त्यामुळे शक्य तितकं ध्येय आपल्याला मिळवणं जमणार आहे याची सहजता विचारांमधे बाळगत चला. त्याने मन अधिक प्रबळ होईल.

अंशुलिखित

संघर्ष अटळ आहे. पण संघर्ष सुरू असताना आपल्याला संयम राखत आपल्या बुद्धीचा चौकसपणा हा कायम राखून ठेवायचा असतो. त्याकरता साहजिकचं आपल्यामधे हळूहळू आपण दैनंदिन जीवनात सहनशीलता व जगासोबत थोड्याफार गोष्टी ॲडजस्ट करण्याच्या पैलूंमधून संयम निर्माण करत असतो. बुद्धीला खतपाणी देणं ही शिक्षणाची व तुमच्या कल्पनाशक्तीची महत्त्वाची भूमिका असते. कल्पकतेसाठी नेहमी मनाचे उत्सुकतेचे ( क्युरिऑसिटीचे.) द्वार उघडे ठेवले पाहिजे.

अंशुलिखित

स्वत:ला फारस एकलकोंड करून घेऊ नका. भलेही अनेकदा असं म्हटल्या जातं की, ध्येयाकडे जाण्यासाठी प्रयत्न करताना एकट्याने एकांतात मेहनत करायची असते जे खरचं आहे. परंतु त्या प्रवासात वाहताना आपण दुनियेशी फार भिन्न होऊन जाऊ नये याचही भान रहायला हवं. मित्रमैत्रिणी, काही ठराविक चांगले नातेवाईक असतील वा इतर नाती असतील त्यांच्याशी आपल्या मनातील सर्व गोष्टींचा उलगडा करत चला.

अंशुलिखित

समन्वय साधता येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही ठरवलेल्या ध्येयाकडे जाताना, त्याविषयी असलेल्या दिशा व त्यावरून तुमच्या बुद्धीला व स्वत:च्या इतर आयामांना साधावा लागणारा जो काही ताळमेळ असेल त्याची योग्य सांगड घालता येणं अधिक गरजेच आहे.

अंशुलिखित

निर्णयक्षमता ही फार महत्वाची बाब असते, कोणत्या वेळी कोणत्या स्थितीत तुम्ही काय निर्णय घेऊ शकलात हे फार महत्त्वाचं आहे. पण यात एक बाब महत्त्वाची ती अशी की, जेव्हा दोन पर्याय समोर असतील आणि एक निवडून पुढे जालं तेव्हा दोन्हीपैकी एका निर्णयात काही अंशत: चांगल्या तर काही अंशत: वाईट गोष्टी या दोन्ही पर्यायांमधे घडणारचं आहेत. तेव्हा जो निर्णय निवडून पुढे जालं त्याविषयी कधी फार नकारात्मक वा पश्चातापासारख्या भावना मनात जागू देऊ नका.

अंशुलिखित

अनेकदा असं होतं, तुम्ही एखादी अडचण आली की लगेच तिच्या सोलूशनकडे लक्ष देऊ लागता अन स्वत:च्या प्रदीर्घ महत्वाच्या असणाऱ्या ध्येयावरून विचलीत होता; तरं असं न करता "तात्पुरत्या अडचणीचं नंतर वेळ घेऊन, दुर दृष्टीकोन बाळगून जे उत्तर मिळणारं आहे ते कैक पटीने अधिक समृद्ध व योग्य असणारं आहे याची खात्री बाळगुन तुर्तास असलेल्या अडचणींचे विचार सतत मनात घोकत न बसता मुळ ध्येयाला प्राप्त करण्याच्या दिशेत मग्न व्हा."

अंशुलिखित

स्वत:मधे अनेक गोष्टी अनेक छंद, अनेक आवडी, अनेक ध्येय लपलेली असतात. त्यांच्याकडे लक्ष देता आलं की जगण्यातला दैनंदिन जिवणात सुजलाम सुफलाम व्हायला मार्ग मिळून जातो.

अंशुलिखित

अनेकदा अशीही वेळ आपल्यासमोर असते जिथे वाटतं राहतं की, आपण संपत चाललोय का? किंवा आपल्या अस्तित्वाची खरचं काही गरज आहे का? पण अशा प्रसंगांमधे कायम एका काजव्याएवढ्या प्रकाशाची गरज आपल्याला हवी असते, एखादी साथ हवी असते, कुणीतरी सांगणार हवं असतं की तू लढत रहा तुझ्यात धमक आहे. दुसरीकडे आजचं जग फार मटेरिअलीस्टिक होत चाललेलं असताना अशी दाद कोणी साध्या चांगल्या मित्रालाही कधी देईल का याचीच शंका निर्माण होऊ लागली आहे? पण कुणी म्हणणार नसलं तरीदेखील आपल्याला नव्याने रूजायचं आहे हे कायम ध्यानात ठेवा. तुम्ही रूजून तुमच्या व्यक्तिमत्वाचं यशातलं रुपांतल झालेलं असताना त्या वटवृक्षाच्या सावलीत हेच कुणी दाद न देणारेदेखील तुमच्याच सावलीच्या घेऱ्यात रहायला लागतील. जगण्यासाठी मी आजचा दिवस बदलेन, मी परिस्थिती बदलेन, मी पिढीजात चाललेली कमकुवत स्थितीला बदलेन, जगण्यातली गम्मत पहायला स्वत:मधली इतकी हिम्मत पुरेशी आहे.

अंशुलिखित

सहसा अनेकदा आपण अकारण इतरांच्या प्रगतीशी स्वत:च्या वयासोबत तुलना करत राहतो, त्याने अमुकतमुक वयात हे केलं ते केलं, हे मिळवलं वगैरे वगैरे... परंतु कायम ध्यानात ठेवा की ज्याने ज्या वयात जे मिळवलं आहे, त्यासाठी त्याच्या आजुबाजुला गोष्टी व परिस्थिती तशी व तेवढी पुरेशी होती. किंबहुना जरी नसली तरी काहीतरी असं असेल जे आपल्या परिसरात नाही वा आपल्यात कदाचित नाही. परिस्थिती यशाला सामोरं जाण्याआधी तुम्हाला सर्वांगाने सशक्त बनवत असते, त्यामुळे स्वत:वर विश्वास बाळगत व इतर गोष्टींचा मुळ दृष्टीकोन यांचा आढावा घेत चला.

अंशुलिखित

व्यावहारिक ज्ञान हे तुम्हाला कोणीही फारसं शिकवत बसतं नाही. किंवा ते सहसा "तुमचं तुम्ही बघून घ्या", अशा तत्त्वात आपल्याकडे त्याविषयी फारशी तजविज करण्याचा आटापिटा कोणी घेत नाही. त्यामुळे शक्यतो, कॉलेजवयीन जिवण असेल वा इतर कोणत्या शक्यता असतील जिथे तुम्ही इतरांशी स्वत:ला कनेक्ट करू शकता तिथून जमेल तेवढं आत्मसात करत चला. अनुभव ही महत्वाची पायरी आहे, तिला योग्य साच्यातून पहात चला.

अंशुलिखित

नैराश्य हा सहसा प्रत्येकाच्या जिवणाचा कधीतरी भाग होतोच. त्यावेळेस नकारात्मक परिस्थीतीत किमान एक असा प्रकाशाचा किरण तुमच्या मनात तेवत राहिला पाहिजे जो सतत याची ग्वाही देईल की, ही कातर काळरात संपून तुमचे अधिक प्रगल्भ दिवस येणार आहेत. ज्यात आजूबाजूचा परिसर, हे लोकं, हे नातेवाईक, हे सर्व जग तुमच्या आस्तित्वाची दखल घेणार आहे. ती एकमेव किंचीतशी आशाही तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढण्यास फार मदत करते.

अंशुलिखित