22 Miss U Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
भाषा प्रेमाची आज मला कळते आहे, नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे, दूर असूनही मन मनाशी जुळते आहे, आठवणीतही सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळते आहे…
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते…
आज तुझ्या आठवणींमध्ये रमुन रहावसे वाटते, तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावसे वाटते, किती छान झाले असते जर घड्याळाचे काटे माघे घेता आले असते, तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगता आले असते…
कधी तरी मन उदास होते, हळू हळू डोळ्यांना त्याची जाणीव होते, आपोआप पडतात डोळ्यांतून अश्रू, जेव्हा आपली माणसे दूर असल्याची जाणीव होते…
जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही दुखावले जाता.. जेव्हा तुम्ही दुखावले जाता, तेव्हा तुम्ही द्वेष करता.. जेव्हा तुम्ही द्वेष करता, तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता.. जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मिस करायला लागता.. आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…
आठवण येणे आणि आठवण काढणे, यात खूप फरक आहे, आपण आठवण त्यांचीच काढतो, जे आपले आहेत… आणि आठवण त्यांनाच येते, जे तुम्हाला आपले समजतात…
दुरावा आहे पण, मन तर एकच आहे ना.. प्रत्यक्षात सोबत नाहीस, पण हृदयात तर तूच आहेस ना…
वाट तुझी पाहायची किती, कधी तुला कळणार? आयुष्य असे जगून, मी एकटाच किती झुरणार…?
तू माझ्यापासून दूर आहेस, हृदयापासून नाही.. तू माझ्यापासून दूर आहेस, डोळ्यांपासून नाही.. तू माझ्यापासून दूर आहेस, स्वप्नांतून नाही.. तू माझ्यापासून दूर आहेस, माझ्या आठवणींपासून नाही
जीव लावलेल्या माणसाला स्वतःपासून तोडतांना काय त्रास होतो हे फक्त, त्यालाच कळू शकते, ज्याने मनापासून खरे प्रेम केलेले असते…
मला नाही जमत, तुझ्यापासून दूर रहायला.. रडायला येत असतांनाही, हसत हसत जगायला.. पण…. मला फार आवडतं, तुझ्या आठवणीत जगायला.. प्रत्यक्ष सोबत नसलो जरी, स्वप्नात तुला पाहायला…
माणूस गमावणे हे सर्वात मोठं नुकसान.. आणि त्याहीपेक्षा मोठं नुकसान म्हणजे, त्यांच्या आठवणीत आयुष्यभर जगणं…