182 Sad Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलीस हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे, म्हणजे काहीच जगणे नाही.
मी मनसोक्त रडून घेते, घरात कुणी नसल्यावर. मग सहज हसायला जमतं, चारचौघात बसल्यावर.
तुझ्यात आणि माझ्यात, फक्त थोडाच फरक होता. तुला वेळ घालवायचा होता, आणि मला आयुष्य.
ज्या व्यक्तीसोबत आपली आयुष्यभर राहण्याची इच्छा असते, त्या व्यक्तीपासून, दुर जाणे खुप कठीण असते.
तु सोडून गेलीस मला तरी, मी वाट पाहणार. अखेरच्या श्वासापर्यंत, फक्त तुझा अन, तुझाच राहणार.
ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात.
प्रेम कधीच चुकीचे नसते, कदाचित निवड चुकीची असू शकते.
जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका, एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका.. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका, सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका.
ती नेहमी म्हणायची, जे होते ते चांगल्यासाठीच होते.. मग तिचं मला सोडून जाणे, हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?
कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका.. आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका !
सोडून जायचे असेल तर बिंदास जा पण, लक्षात ठेव.. मागे वळून बघायची सवय मला पण नाही.
चेहऱ्यावर नेहमीच हसू, पण मनात खूप काही साठलेलं. आले जरी डोळे भरून, ते कोणालाही न दिसलेलं !