अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
जिंदगीत एखादी गफलत होते, एखादा गैरसमज होतो, एखादी व्यक्ती दुरावते तर कधी एखादं नातं, पण शेवटी सुर्याला जसं अस्तापर्यंत जाऊन पुन्हा नव्याने यायचं असतं; आयुष्याची घडी तशीच बसवावी लागते अगदी नाईलाज असला तरी. काही निर्णय गंभीर आणि मन खंबीर; स्वत:ला तसं बनवावं लागतं.
ध्येय पुर्णत्वाला जाईपर्यंत सारे अपमानाचे घोट पिऊन शांत बसावं लागतं. त्या अपमानाची एक ठिणगी बनवून, ज्वालामुखीप्रमाणे ध्येय मिळवण्यासाठी त्याचा वापर करता यायला हवा.
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
राग वाईट गोष्ट असली आणि आपण तिला अनेक प्रसंगांमधे संयमाने घेण्याचा प्रयत्न दरवेळी करत जर असलो तर एखादवेळेस तो राग बाहेर पडणं गरजेच असतं. मानवी स्वभाव हा सर्वच भावनांना व्यक्त करण्यासाठी असतो. फक्त एवढी निश्चितता रागात ठेवावी की आपण एखाद्याला प्रमाणाबाहेर दुखावणार नाही. वा नुकसान करणार नाही.
चारही दिशांना अंधार दाटू लागल्याच जाणवत असेल, पुर्णत: हतबलता येत चालली असेल, तुम्ही खचत चालला असालं तर अशावेळी शक्यतो अवांतर वाचनाचा सहारा स्वत:ला रिफ्रेश करण्यासाठी आवर्जून घ्या. अथवा पुर्णत: स्वत:च्या योजनांना तात्पुरता आराम द्या. निश्चिंत व्हा, "जियेंगे तो ओर भी लढेंगे" या उक्तीप्रमाणे विश्रांतीच्या काळात असं बलाढ्य मन तयार करा की पुढील घौडदौड चांगली प्रभावी झाली पाहिजे.