जेव्हा धैर्य एका टप्प्यावर भरपुर खचत तेव्हा इतरांपाशी व्यक्त व्हायला जमत नसेल तर स्वत:शीच व्यक्त होणं अधिक गरजेच असतं. आपल्या डोळ्यासमोरील परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वत:च्या आधीच्या जिवणात तुम्ही सामोऱ्या गेलेल्या संकटांची आठवण करून त्यांना स्वत:पाशी व्यक्त करा, कटू आठवणींना उराशी कवटाळून रडा हवं तर पण त्यातुन भुतकाळात तुम्ही सावरला होतात हेही पुढे स्वत:ला आठवण करून द्या. आणि हळूहळू स्वत:लाच खंबीर करत एकेक दिवस मनाचं धैर्य वाढवायला लागा.
बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
विचारांमधे शांतता निर्माण झाली पाहिजे. विचार ठराविक असावेत, प्लॅनिंगच्या दिशेने त्यांची वाटचाल असावी. जेणेकरून मेंदूत विचार कमी व अधिक शांत असतील तेव्हाच आयुष्याचा प्रवाह हा गतीशील व स्थैर्य निर्माण करून चालत राहतो.
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत राहाव्या लागतील.
जराशीही किंमत नसलेल्या लोकांना मदत करायच्या भानगडीत पडू नका. अशा लोकांचा असा स्वभाव दोन भेटीगाठीत अथवा दोन एक चर्चेतच पुरेसा समजून येतो. मदत करायला हरकत नाही, पण नंतर दोष तुमच्यावर टाकूनही ते मोकळे होणारे लोकं असतात. त्यामुळं अशांना "तुमची वाट तुम्ही चाला", हेच शहाणपण शिकवायचं.
जिवणाला फार कटीबद्ध करू नका. नियम लावून विनाकारण स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला हरवू नका, शिस्त जरुर असावी पण नियमांचा अतिकाटेकोरपणा जगण्यातला आनंद हिरावून घेतो याचीही जाणिव ठेवा.