आपल्या अंतरंगात कधीतरी क्रोधाची भावना निर्माण होणं हे नैसर्गिक आहे. पण आपल्यामधे एखाद्याबद्दल कटुता वा अगदीच तीव्र तऱ्हेची द्वेषाची ठिणखी कधीच पेटू नये. कारण या नकारात्मक गोष्टींनी आपणच आपल्यातलं असलेलं कौशल्य, आपलं चैतन्य, आपल्यातील तजेलदारपणा हे नकळतपणे नष्ट करत असतो. त्यामुळे अगदीच इतरांबद्दल सहसा वाईट तर नकोच पण विचारही न करता आपला मार्ग दवडत रहायचा इतकचं!

किरण पवार (अंशु)
Share:

More Like This

सारे नजारे नकारात्मक होऊ लागले तर स्वत:ला सावरण्यासाठी हवा तितका वेळ घ्या. एकदा ठणठणीत सकारात्मकतेच्या पुर्वपदावर आलात की, प्रत्येक क्षण तुमच्याच हिताचा ठरणार आहे. जिवण फार शाश्वत आहे, त्यासाठी कधीच अतिघाई करून स्वत:च्या स्वप्नांचा व ध्येयाचा चुराडा करुन घेऊ नका.

किरण पवार (अंशु)

आज जग फार पुढे चाललयं, सारी माहिती गुगलवर झटक्यात मिळते. अशात एखाद्या नवख्या विषयावरची माहिती एखाद्या क्षणी एखाद्या व्यक्तीसमोर आपल्याकडून चुकीची सांगितल्या गेली किंवा चुकलीही समजा तर हरकत नाही; त्यात कमीपणा वाटून किंवा नंतर एखाद्या क्षणी आपल्यालाही कसं सार ठाऊक असतं, आपल्याही ते येतं असं दाखवायची गरज नसते. प्रत्येकाला सर्वच विषयातलं जगभरचं सारच ज्ञान असावं असं गरजेच नाहिये. आणि अनेकांना स्वत:चंच खरं असंही म्हणायची सवय असते तर त्यांना दुर्लक्ष करायचं.

किरण पवार

अनेकदा आपण शक्यतांचा आधार घेत पुर्व अंदाजानुसार आपले ध्येयातील टप्पे ठरवत असतो, दरवेळी त्या टप्प्यांच्या हिशोबतच गोष्टी होतील अशातला भाग नाही. कधी एखादा टप्पा फार तीव्र स्वरूपाची कठीणाई निर्माण करू शकतो, त्यात मानसिक खच्चीकरण होऊ शकतं पण म्हणून कधी स्वत:च्या चालू वाटचालीवर शंका घेत ध्येयाबद्दल डगमगू नका.

किरण पवार (अंशु)

दैनंदिनीच्या डायरीत लिहून ठेवताना ज्याप्रमाणे काही थोडेसे नको वाटणारे प्रसंग आपण लिहणं सहसा टाळतो तर त्याच प्रसंगांप्रमाणे आपण दैनंदिन आयुष्यात काही गोष्टींकडे कटाक्षाने दुर्लक्ष करायचं असतं. थोडक्यात एवढा अमुकतमुक भाग वगळून बाकी आपला फोकस अगदी व्यवस्थित दिशेत जातोयं न; एवढं पुरेसं असावं. कारण अनावश्यक गोष्टी नकळतपणे अधिकतर नुकसान व मनाचं अकारण खच्चीकरण करत असतात.

अंशुलिखित

शंका सहसा तुमच्या यशाकडे जाणाऱ्या मार्गावरील अडथळ्यांना आणखी बळकटी देतात आणि त्यामुळे शंकेसहित केलेल्या प्रयत्नांमधून अपयशाची पाऊले तुमच्या पदरात पडू लागतात तेव्हा कायम खंबीर आत्मविश्वासाने हर एक प्रयत्न सातत्याने सुरू ठेवा. शंकेची मनात चुकचुकणारी पाल ही नेहमी एक वाईट वृत्ती आहे.

किरण पवार (अंशु)

अनेकदा असं होतं, तुम्ही एखादी अडचण आली की लगेच तिच्या सोलूशनकडे लक्ष देऊ लागता अन स्वत:च्या प्रदीर्घ महत्वाच्या असणाऱ्या ध्येयावरून विचलीत होता; तरं असं न करता "तात्पुरत्या अडचणीचं नंतर वेळ घेऊन, दुर दृष्टीकोन बाळगून जे उत्तर मिळणारं आहे ते कैक पटीने अधिक समृद्ध व योग्य असणारं आहे याची खात्री बाळगुन तुर्तास असलेल्या अडचणींचे विचार सतत मनात घोकत न बसता मुळ ध्येयाला प्राप्त करण्याच्या दिशेत मग्न व्हा."