शब्दांच्या मधलं बरचं काही समजून घ्यावं अशी अपेक्षा असते, माणूस निसर्गत: तेवढा चमत्कारिक नाहीये, त्यामुळे मला वाटतं मनात असेल ते बोलून मोकळं व्हावं. उगाच एखाद्याच्या मनावर टांगती तलवार फिरवणं जरा चुकीचचं. त्यामुळे संवादांमधून नात्यांमधे स्पष्टोक्तेपणा आणणं फार गरजेच आहे. आपण अनेक नात्याबद्दल अनेकदा समजुन न घेता, उघडपणे न बोलता जे आतल्या आत दाबून ठेवतो त्या गोष्टींनी नाती संपुष्टात येतात कारण आपल्यात संशयाचा अकारण घेरा अशाने वाढत जातो.
तुमच्या साऱ्या शक्यतांचे मार्ग बंद होण्याच्या मार्गावर असतात तेव्हा तुम्हाला स्वतःच्या मनगटावर अधिक विश्वास असण्याची गरज असली पाहिजे. तुम्ही स्वत:च्या मनगटावर, आपल्या मेंदूच्या प्रगल्भ ताकदीवर विश्वास ठेवला पाहिजे पुढे ठराविक शक्यतांना तडा देत एक नवी दृष्टी उभी राहते जी तुम्हाला विजयासाठी पुन्हा सज्ज करते.
विचारांमधे शांतता निर्माण झाली पाहिजे. विचार ठराविक असावेत, प्लॅनिंगच्या दिशेने त्यांची वाटचाल असावी. जेणेकरून मेंदूत विचार कमी व अधिक शांत असतील तेव्हाच आयुष्याचा प्रवाह हा गतीशील व स्थैर्य निर्माण करून चालत राहतो.
तुमच्या स्वत:बद्दलच्या पुर्वधारणांना कधीच 100% सत्य मानून चालू नका. बदल हा जिवसृष्टीचा नियम आहे, तुम्हीही टप्प्याटप्याने बदलत नवीन काहीतरी आत्मसात करत आज एका ठराविक स्थितीत आला असालं. तेव्हा मनाला कायम खंबीर ठेवा. तुम्ही जर काही धारणा करून स्वत:ला एखाद्या चौकटीत अडकवले तर ती चौकटच तुमची अंतीम रूपरेषा बनून जाते, त्याबाहेर पंख पसरवण्याची व त्यापेक्षा प्रखर मोठ्या ध्येयाकडे झेप घेण्याची क्षमता आजमावून पहात चला.
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
कृत्रीमपणाच्या जाणिवेतून बाहेर पडा, तुम्ही काही आत्मसात करत असालं, ध्येयाकडे वाटचाल करताना काही विशिष्ट पद्धती वापरत असालं, कोशल्य विकसित करत असालं तर अशावेळी ते करताना मनातुन सारंकाही ध्यानात घ्या. मनोभावे जर गोष्टी करालं तर त्या तडीस जातातचं.