सहसा अनेकदा आपण अकारण इतरांच्या प्रगतीशी स्वत:च्या वयासोबत तुलना करत राहतो, त्याने अमुकतमुक वयात हे केलं ते केलं, हे मिळवलं वगैरे वगैरे... परंतु कायम ध्यानात ठेवा की ज्याने ज्या वयात जे मिळवलं आहे, त्यासाठी त्याच्या आजुबाजुला गोष्टी व परिस्थिती तशी व तेवढी पुरेशी होती. किंबहुना जरी नसली तरी काहीतरी असं असेल जे आपल्या परिसरात नाही वा आपल्यात कदाचित नाही. परिस्थिती यशाला सामोरं जाण्याआधी तुम्हाला सर्वांगाने सशक्त बनवत असते, त्यामुळे स्वत:वर विश्वास बाळगत व इतर गोष्टींचा मुळ दृष्टीकोन यांचा आढावा घेत चला.
अचानक कधीतरी जेव्हा मन सैरभैर होतं, विचारांच्या तर्कशुद्ध वाटा बंद झाल्याचा भास होऊ लागतो, क्षणोक्षणी आणि पुर्ण दिवस अथवा रात्रभर एक नकारात्मकता उगाच मनभर पसरली जाते; आयुष्यात नकळत घडलेल्या काही चुका आठवून मन थोडसं धासळलेल्या परिस्थितीत जातं; तेव्हा आपल्यात साचलेली नकारात्मकता ही अश्रूंवाटे मोकळी करून द्यावी. माणुस जर जीवनात ध्येयांकडे एक उर्जा घेऊन नेहमी आजवर चालत आला असेल तर त्याच्या अंतर्गत भागात तेवढी नकारात्मकता साचतं राहणं हे नैसर्गिक आहे. म्हणून आधीच्या चुकांकडे, काही जुन्या निर्णयांकडे पुन्हा एक केवळ गेलेली संधी म्हणून पाहत अश्रूंवाटे त्यांना वाट मोकळी करून दिल्यास नव्याने पहाटेच्या प्रहरीचा आशेचा किरण शोधता येणं शक्य होतं.
तुम्हाला वर्तमानात भुतकाळात तुम्ही करत आलेल्या संघर्षाची जाणिव कायम रहायला हवी. ज्याप्रमाणे गोष्टी, कथा, सिनेमा हे लक्षात राहतं, त्याचप्रमाणे स्वत:च्या संघर्षाची हर एक नोंद लक्षात ठेवत चला. ही नोंद तुम्हाला पुन्हा नव्या व ताकदीच्या संकटाविरोधात लढण्याची प्रेरणा देत राहिली पाहिजे.
तुमच्या मनाच्या धैर्यशील भावनांवर कायम ठाम रहा. मनाचं धैर्य हेच उभ्या आयुष्यात उत्तम जगायला शिकवतं.
तुम्ही स्वत:ला जितकं प्रखरपणे पाण्यासारखं विचारप्रवाहाला नितळ वाहू द्यालं तितकं तुमच्या मानसिक व इतर बाह्यघटांसाठी चांगल असतं. एखादा विचार सतत डोक्यात अडून राहिला तर मनावर नकारात्मक व वाईट विचारांची जळमटं चढायला अधिक वेळ लागत नाही.
न घडलेल्या गोष्टी किंवा काही अनोखे प्रकल्प, अनोख्या युक्त्यांची अंमलबजावणी, अनोखे कार्य करण्यासाठी जो तोडगा आपण शोधू शकत असू. तो तोडगा उत्तम असेल यावर विश्वास ठेवून निसंकोचपणे पुढची वाट चालत रहा. संकोच मनातल्या योजनांना नष्ट करतो पण काहीतरी करण्यात साध्य झालेल्या चुका व त्यातली शिकवण या गोष्टी यशाच्या जवळील मार्ग खुला करत असतात.
मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.