कोणतीही सवय जी तुम्ही शरीराला लावता अथवा मनावर बिंबवता त्यातून प्रभावीपणे एका दिशेची वाटचाल घडत जाते. त्यामुळे दैनंदिन जीवण जगताना स्वत:च्या छोट्याशादेखील गोष्टींची नोंद स्वत:च्या विचारांमधे घेऊन पुढे वाटचाल करत रहा.
तुमच्या उद्दिष्टांच्या मधे कधीही किंतु पंरतु वा कोणत्याही प्रकारच्या शंकेला थारा कधीच येऊ देऊ नका. उद्दिष्ट स्पष्ट व तितकचं प्रखर असावं आणि त्यासाठी स्वत:ला अगदी झोकून द्या.
काही घटनांच्या जखमा या अनेकदा विचार करुनदेखील पुसता न येण्यासारख्या होऊन जातात. जखम मनावर इतक्या गंभीरतेने हावी होऊ लागते की मन खचत जाऊ लागतं. अन नैराशाच्या वाटेवर प्रवास सुरू होतो. नैराश्यात माणसाचं मन असं बंदिस्त होऊन जातं की त्याला बाह्यगोष्टींचा कितीही प्रभावीपणा दाखवा ते मनाच्या अंतर्गत लढाईखेरीज बाहेर येत नाही. त्यामुळे सहसा रोज स्वत:ला गरजेच असेल इतकं हसरं, मनमुराद, निखळ व सहज जगण्यासारखं ठेवत चला. मनाला छोट्या गोष्टींचा आनंद देत चला. ज्यामुळे एकतर नैराश्य फार येणार तरी नाही किंवा आलचं तर आजवरच्या प्रवासातील तुमच्या मनाने केलेल्या खंबीर वाटचालीची त्याला पुन्हा आठवण करून देत त्यातून बाहेर पडा. मोकळे फिरा, वाचण करा, स्वैराचार करत रहा, सिनेमे चिक्कार पहा... नवे दृष्टीकोन नवं जग त्यातून कळतं.
तुमच्या मनात जर राग, द्वेष वा सतत एखाद्या गोष्टीचा संकोच साचून राहू लागला तर तुम्ही तुमच्या शारिरिक आरोग्याला नकळत हानी पोहोचवू लागता व त्यातूनच मानसिक खच्चीकरणही व्हायला सुरूवात होते त्यामुळे सहसा आनंदी, मनाला तेजस्वी व शक्य तितकं साधेपणाने जपत चला बाकी गोष्टी सर्व आपोआप चांगल्या घडत राहतील.
स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.
तिरस्कार हा एकतर मनाला पेटून उठवण्याचं कार्य तरी करू शकतो किंवा तो मनाला नकारात्मक बुद्धीने वागायला प्रवृत्त तरी करू शकतो; माणसाच्या वृत्तीत सारेच गुण सामावलेले असतात तो कधीतरी चुकून एखाद्याचा तिरस्कार करू शकतो पण मग या केलेल्या तिरस्कारातून आपणच इर्षेने पेटून नव्याने ध्येय गाठण्याची प्रेरणा स्वत:ला दिली पाहिजे.