कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.
संघर्ष अटळ आहे. पण संघर्ष सुरू असताना आपल्याला संयम राखत आपल्या बुद्धीचा चौकसपणा हा कायम राखून ठेवायचा असतो. त्याकरता साहजिकचं आपल्यामधे हळूहळू आपण दैनंदिन जीवनात सहनशीलता व जगासोबत थोड्याफार गोष्टी ॲडजस्ट करण्याच्या पैलूंमधून संयम निर्माण करत असतो. बुद्धीला खतपाणी देणं ही शिक्षणाची व तुमच्या कल्पनाशक्तीची महत्त्वाची भूमिका असते. कल्पकतेसाठी नेहमी मनाचे उत्सुकतेचे ( क्युरिऑसिटीचे.) द्वार उघडे ठेवले पाहिजे.
चारही दिशांना अंधार दाटू लागल्याच जाणवत असेल, पुर्णत: हतबलता येत चालली असेल, तुम्ही खचत चालला असालं तर अशावेळी शक्यतो अवांतर वाचनाचा सहारा स्वत:ला रिफ्रेश करण्यासाठी आवर्जून घ्या. अथवा पुर्णत: स्वत:च्या योजनांना तात्पुरता आराम द्या. निश्चिंत व्हा, "जियेंगे तो ओर भी लढेंगे" या उक्तीप्रमाणे विश्रांतीच्या काळात असं बलाढ्य मन तयार करा की पुढील घौडदौड चांगली प्रभावी झाली पाहिजे.
आयुष्यातलं ध्येय कायम उराशी बाळगून पुर्णत्वाची जाणिव मनाला करून देता आली पाहिजे, ध्येयासाठी विषेश आखणी केलेली असली तरी कधीकधी काही अडचणी त्यात भर टाकून ओझं वाढल्याची जाणिव मनाला जेव्हा करू देऊ लागतात; त्या काळात थोडासा संयम बाळगत मनाला स्फुर्तीची स्पंदन चढवत नव्याने डावाच्या पुर्णत्वाची आखणी करायची असते.
तुमच्या धेय्यावरून जग तुम्हाला ओळखत असतं.
“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.”