तुम्हाला जर फार हळवेपणा अन सततच्या सहानुभूतीची सवय लागली तर तुम्ही अनेकदा काल्पनिक गोष्टी रचायला लागता. हे करताना तुम्ही अधिकतर आपल्या आजुबाजुच्या सर्व लोकांना थोडसं दुय्यम समजून सतत त्यांच्या कोणत्याही घटनांना काहीतरी काऊंटर घटना किंवा काल्पनिक रचित कथा सांगून स्वत:ला वेगळं फिल करून द्यायला लागता. त्यामुळे शक्यतो खोट्या सहानुभूतीती सवय लागणार नाही याची काळजी घ्या.
जगताना मनाला पुर्णत: व्यापून जगता आलं पाहिजे. ज्या ध्येयाकडे लक्ष आहे त्याकडे पाहताना नजर अगदी स्पष्ट हवी. एकदा स्पष्ट कल्पना नजरेतून योग्य अवतरली की मग पुढील प्रवासाचा रस्ता टप्याटप्याने आखता येतो.
संघर्ष हा वाढत जातो तो कमी कधीच होत नाही, दिवसेंदिवस तुम्ही स्वत:तील क्षमतांचा जितका अधिक विकास करत जाता तितक्याच प्रमाणात दिवसेंदिवस तुमचा संघर्षही वाढलेला असतो. आपली दृष्टी कायम दृढ अर्थात निश्चित ठेवली की ठरवलेल्या ध्येयातलं सारकाही जिंकता येतं.
बंडखोरी ही संकल्पना चुकीची वा ती नेहमी चुकीची असावी असं नाही. तुम्ही स्वातंत्र्यासाठी, हक्कांसाठी, मुलभूत गरजांसाठी वा अशाच खऱ्या गरजेच्या व अत्यावश्यक गोष्टींसाठी जेव्हा बंडखोरी करता तेव्हा ती उपयुक्त असते. ती शिक्षणाकरता असो, कमी वयात लग्नाला विरोधापासून असो...!!
भरकटू नका. बऱ्याचदा भविष्यात कायमस्वरूपी स्थैर्य देणाऱ्या गोष्टी या सुरूवातीच्या टप्यांवर प्रचंड वेळ घेत राहतात; त्यावेळी अशा परिस्थितीत मन:स्थिती अगदी एकरूप, संघटित व घट्ट प्रमाणात एकवटून ठेवावी लागते. टिकवलेल्या मनाच्या धैर्याचा, आपल्या दिशेचा, आपल्या योजनांचा बांध हा फुटू द्यायचा नसतो. एक, दोन प्रयत्न वा योजना जरी चुकल्या तरी दिर्घ ध्येयाकडे जाणारी योजना ही सखोल व्यापक असते इतकं लक्षात ठेवा.
आपण वेळीच सावरलं पाहिजे, आपण जिथे चुकत असू जिथे खचत असू तिथून शक्य तितक्या योग्य वेळी आपण सावरलं पाहिजे. सहसा आपलं सावरणं भविष्यातील आपल्या व्यक्तीमत्वाची पुर्ण प्रतिमा उभं करत असतं, आपल्याला एकेका अडथळ्यातून सावरायला जो वेळ आधी सहा महिन्यांचा लागत असेल पुढे तो एक महिन्यावर येतो, नंतर एका आठवड्यावर नंतर फार फार तर दोन तीन दिवसात तुम्ही स्वत:च नव्याने सज्ज व्हायला लागता. पण त्याकरता प्रथम वेळी नीटपणे सावरणं महत्वाचं आहे.
क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..