तुमच्याजवळ तुम्ही आत्मसात केलेल्या कला, तुमची प्रगल्भतेकडे जाण्याची जिज्ञासू वृत्ती, तुमचा दृष्टिकोन, तुमच्यात सामावलेले व्यापक व मौल्यवान विचार हे कधीच इतर कोणालाही चोरता येऊ शकत नाहीत याची जाण मनाला कायम राहू द्या. ही जाणं तुम्हाला आश्वस्त करते अन हा आश्वस्तपणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे जाताना कोणत्याही ठिकाणी भरकटू देत नाही.
एखाद्या गोष्टीला होकार दिल्यानंतर किंवा काही गोष्टी मनासारख्या न घडल्याने आपलं मन सतत त्या गोष्टी अशा घडायला हव्यात, हे जमलं नाही, हे बरोबर नव्हतं, असं होऊ शकलं असतं या पर्यायांमधेच कितीतरी वेळ अडकुन पडतं; हे होणं नैसर्गिक आहे. पण थोड शांत राहून आपण पुढे मनाला थोडसं कारणांव्यतिरिक्त नव्या पर्यायांकडे वळवू शकते जे मनाला आनंद देतील आणि आपल्याला प्रसन्न राहता येईल.
आपल्यावर अभिक प्रभावी भर द्या. स्वत:ला चांगल व उत्तम बनवणं हे ध्येय तर असलंच पाहिजे. पण त्याचसोबत जगण्यातला गोडवा न हरवता "दरवेळी माझचं खर" हे म्हणण्याची घाई नसली पाहिजे. छोट्याछोट्याशा गोष्टीत माझ असं, माझं तसं, मला याच गोष्टी लागतात, मला हेच नकोयं... यात तुम्ही स्वत:लाच साचेबद्ध करून बहुआयामी पैलुचे दरवाजे बंद करून घेऊ लागले आहात.
मन खंबीर असतं त्या क्षणांमधे विलक्षण ताकद असते, कितीही कंटाळा आला असेल, कितीही टेन्शन आलं असेल, कितीही अडचणी समोर दिसच असतील, तरी अशा वेळी मन मात्र त्या गोष्टींना झुगारून योग्य वाट शोधतचं.
कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे जीवनात कधीच अपयशी ठरत नाहीत.
तुम्ही एखाद्या विचारात अडकून राहू नका, एखाद्या नात्यात अडकून राहू नका, एखाद्या दिशेत स्वत:ला उगाच साचेबद्ध करून ठेवू नका. मलाच "अमुकतमुक इतकंच येत", माझ्याच्याने अमुकतमुक सवय सुटणार नाही, मी अमुकतमुक गोष्टीच करत असतो; ही अशी काही किचकट लेबल्स लावून अन स्वत:च्या व्यक्तीमत्वाला संपवणाऱ्या नात्यात जर अडकून राहिलो तर आपला स्वभाव नैराश्यात गुरफट जातो. त्यामुळे या गोष्टी प्रामुख्याने शक्यतो टाळा.
न घडलेल्या गोष्टी किंवा काही अनोखे प्रकल्प, अनोख्या युक्त्यांची अंमलबजावणी, अनोखे कार्य करण्यासाठी जो तोडगा आपण शोधू शकत असू. तो तोडगा उत्तम असेल यावर विश्वास ठेवून निसंकोचपणे पुढची वाट चालत रहा. संकोच मनातल्या योजनांना नष्ट करतो पण काहीतरी करण्यात साध्य झालेल्या चुका व त्यातली शिकवण या गोष्टी यशाच्या जवळील मार्ग खुला करत असतात.