अनेकदा तुम्ही करत आलेल्या गोष्टी, कामे, तुमच्या अंतर्गत असलेली कौशल्ये यांच्यामुळे सभोवताली वावरणाऱ्या इतर लोकांच्या नजरेत तुमची सिद्धता स्पष्ट करत असता अशावेळी लोकांकडून अनेकदा तुमच्याकडून प्रचंड आशा अपेक्षा विविध रूपात वाढू लागतात आणि कधीकधी तुम्हाला एखाद्या नैराश्याच्या क्षणी हे अपेक्षांच गणितचं स्वत:ला खाऊन टाकेल असं वाटू लागतं. तेव्हा स्वत:च्या मानसिकतेला स्थैर्य देण्याकरता अपेक्षांच्या गणिताचा फारसा विचार न करता चालत रहा.
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.
तुमच्या स्वत:बद्दलच्या पुर्वधारणांना कधीच 100% सत्य मानून चालू नका. बदल हा जिवसृष्टीचा नियम आहे, तुम्हीही टप्प्याटप्याने बदलत नवीन काहीतरी आत्मसात करत आज एका ठराविक स्थितीत आला असालं. तेव्हा मनाला कायम खंबीर ठेवा. तुम्ही जर काही धारणा करून स्वत:ला एखाद्या चौकटीत अडकवले तर ती चौकटच तुमची अंतीम रूपरेषा बनून जाते, त्याबाहेर पंख पसरवण्याची व त्यापेक्षा प्रखर मोठ्या ध्येयाकडे झेप घेण्याची क्षमता आजमावून पहात चला.
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.
सोडून देणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच सोडत नाही