आजच्या जगात वावरताना ठामपणा हा फार गरजेचा घटक आहे. तुम्हाला भलेही तुमच्या स्वप्नांचा, ध्येयाचा विशिष्ट मुद्दा एखाद्या व्यक्तीला समजावता नाही आला तरीदेखील तुम्ही आपल्या ध्येयाप्रती असलेल्या त्या मुद्यावर ठाम राहून त्या मुद्द्यावर अधिक माहिती घेत राहून पुढे जात राहिलं पाहिजे. आधीच "मला इतकंही साधं जमणारं नाही वगैरे", बोलून स्वत:ला अकारण कमकुवत बनवू नये.
तणावपूर्ण वातावरण हळूहळू तुमच्या व्यक्तीमत्वाला अधिक खुलवत जातं. प्रथमदर्शनी आपल्याला ताणतणाव नकोसाच असतो, सर्वांच्या बाबतीत हीच गोष्ट घडते. परंतु तणाव नकोच म्हणून एखाद्या दिशेची वाट न निवडणं हे उत्तर असू शकत नाही. प्रत्येक अनुभव प्रथम असतो, दुसर्या वेळी आपण मनाची स्थिती थोडी अधिक घट्ट बनवतो... तिसऱ्या चोथ्या वेळेत तर आपण समोर येणाऱ्या परिस्थितीला कसं सामोर जायचं याची मनोमन खंबीर तयारी करून ठेवलेली असते. त्यामुळे अगदी निर्धास्तपणे नव्या दिशा, नव्या वाटा चालण्याचा प्रयत्न करावा.
तुमची खरी सचोटी राग/क्रोधाला शांत करण्यासाठी लागते. भलेही प्रसंग कसाही असो कितीही बाका असो तडकाफडकी केलेली गोष्ट वा घेतलेला निर्णय नंतर आयुष्यभराची उणीव म्हणून भासू लागतो. त्यामुळे असं काही होऊ देण्यापेक्षा सचोटीने आपल्यावर ताबा ठेवत गोष्टींना सामोरे जात चला.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....
आयुष्यात चार सुखाच्या सरींची बरसातही नव्याने एखादं कार्य सुरू करायला प्रेरणा देऊन जाते, त्यामुळे जर कधी मन खचलं तर एखादी आवडीची गोष्ट करायला घ्या, जी सकारात्मकेला तुमच्या आत पुन्हा भिनवू शकेल; ज्यामुळे पुढचं काम अधिक सोप्प होईल.
घाईघाईत अतीउत्साही होऊन कोणत्या प्रोजेक्टचे किंवा काही योजनांचे प्रयोजन करून मोकळे न होता, हळूहळू एकेक पाऊल त्या दिशेने ठेवत तुमच्या योजनांना परिपूर्णतेच स्वरूप द्या. अशाने अर्धवटपणे उत्साह करून लावलेली आशा निरूत्साही करणार नाही आणि तुम्हाला हातात पश्चाताप उरणार नाही.