Enjoy the best Quotes. Quotations by
मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी, एकदाच बरसून थांबणारी.. मैत्री असावी रिमझिम सरी सारखी, मनाला सुखद गारवा देणारी.
नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय, जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय.
शब्दामधे गोड़वा आमच्या रक्तामधे ईमानदारी आणि जर कधी ठरवलच, तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी, आमच्या नादाला लागू नका, कारण आमचे मित्रच “लय भारी”
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे मैञी असते.
मैत्री म्हणजे विश्वास, धीर आणि दिलासा, मनाची कळी उमलतांना पडलेला पहिला थेंब, मैत्री म्हणजे दोन जीवांमधला सेतू, मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू.
नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत, नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते , कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत, जमीन मुळात ओली असावी लागते.
तुमच्या Keyboard च्या Y आणि I च्या मध्ये एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे, जरा बघा तर.
दुखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही.. अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही.. आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय हे आयुष्य आयुष्यच नाही.
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा ती पावसाची सर अलगद येऊन जाते, आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते.
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते, कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते. मैत्री म्हणजे त्याग आहे, मैत्री म्हणजे विश्वास आहे हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे मैत्रीच्या या नात्याबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे मैत्रिला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो.
नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते, कधी स्तब्ध तर कधी निरागस होते, भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते, हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.
मैत्री माझी तोडू नकोस, कधीच माझ्याशी रुसु नकोस, मला कधी विसरु नकोस, मी दूर असून जवळ आहे तुझ्या, फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.