Quotes (+)

Enjoy the best Quotes. Quotations by

 

आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा.. पण आई-वडिलांना कधीही सोडू नका.

आई ही एकमेव स्त्री जी माझा चेहरा पाहण्याआधीपासूनच माझ्यावर प्रेम करते.

शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी त्यामध्ये जमीन- आसमानाचा फरक असतो. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात.

समोरच्याला आदर देणे ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून आदर मिळविणे हा सर्वात मोठा सन्मान असतो.

आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो… विचार बदला आयुष्य बदले.

चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगला असे होत नाही.. त्यासाठी त्याचं मन सुंदर असावं लागतं.

आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात… यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.

प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस म्हणून जगा.. आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची नवी सुरुवात करा.

आयुष्यातील सगळ्यात मोठा अपराध.. तुमच्यामुळे कोणाच्यातरी डोळ्यात अश्रू येणे.

आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही कारण आयुष्य हे फार सुंदर आहे