जो या वेड्या मनाला बऱ्याचदा रडवतो, तो वेडाच या मनाला खूप खूप आवडतो.
परकचं करायच होत तर जवळ का गं घेतलस ? विश्वासच नव्हता तर प्रेम का गं केलस ?
जे जगतात ते प्रेम करतात आणि जे जळतात ते लफडं म्हणतात.
प्रेमाची खरी किंमत ते दूर गेल्यावर कळते, कितीही दुर्लक्ष केले तरी, नजर मात्र तिथेच वळते.
जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात. छोट्याश्या वादळानं विश्वासाची घर मोडायची नसतात.
विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही, तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.
तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं मन केलं.! तुला आवडतं खेळायला म्हणून.. हृदयाचं खेळणं केलं..
नाही म्हणालीस जरी तू, नाही दुखी होणार मी, जगत होतो, जगत आहे, जगतच राहणार मी. आता निरोप घेतो दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.
येवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ, माझ्या डोळ्यातील आसवांतल्या वेदना ओळखून बघ.
जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल, तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.
जाऊदे तिला मला सोडून दुसऱ्याच्या मिठी मध्ये तसेही एवढ प्रेम करूनसुद्धा जी माझी नाही झाली, दुसऱ्याची तरी कशी होणार?