विचारांमधे शांतता निर्माण झाली पाहिजे. विचार ठराविक असावेत, प्लॅनिंगच्या दिशेने त्यांची वाटचाल असावी. जेणेकरून मेंदूत विचार कमी व अधिक शांत असतील तेव्हाच आयुष्याचा प्रवाह हा गतीशील व स्थैर्य निर्माण करून चालत राहतो.
भावनांना मिटवण्यापेक्षा वाहू दिलेलं अधिक सोयिस्कर असतं, बऱ्याचदा दैनंदिन जीवनात गोष्टी मनासारख्या घडत नसतात अशावेळी स्वत:ला सावरण्यात अधिकाधिक वेळ खर्च करण्यापेक्षा एकदाच मोकळं होऊन लवकर पुर्वपदावर आलेलं कधीही उत्तम.
स्वप्न पाहतच असालं तर मोठाच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात.
कृत्रीमपणाच्या जाणिवेतून बाहेर पडा, तुम्ही काही आत्मसात करत असालं, ध्येयाकडे वाटचाल करताना काही विशिष्ट पद्धती वापरत असालं, कोशल्य विकसित करत असालं तर अशावेळी ते करताना मनातुन सारंकाही ध्यानात घ्या. मनोभावे जर गोष्टी करालं तर त्या तडीस जातातचं.
अनेकदा संयमाचा बांध फुटून आपल्या मनावर एक ओझं निर्माण होतं, ते सर्वच बाजुंनी येतं. वयाच्या तरूणपणात असालं तर सहसा करियर निवडी, तुमच्यावर कधीकधी ऐनवेळी आलेल्या जबाबदाऱ्या, कधीकधी काही मनाविरुद्ध घ्यावे लागलेले निर्णय, सारे अगदी राक्षसाप्रमाणे घातक आठवणी बनून डोळ्यात उभे राहतात. अशावेळी अगदीच स्वत:ला खमकं समजून ते आतल्या आत साचवण्याचा प्रयत्न करू नका. माणुस मनाने मोकळा व्हायला हवा, तेव्हा स्वत:तील ओझं आलेल्या विचारांना रडून, एकट्यात रडून का असेना पण एकदाचं मोकळं नक्की करा. त्यानंतर तुम्ही नव्याने स्वत:ला योग्य विचारांच्या दिशेत घेऊन जाऊ शकालं.
बंडखोरी ही संकल्पना चुकीची वा ती नेहमी चुकीची असावी असं नाही. तुम्ही स्वातंत्र्यासाठी, हक्कांसाठी, मुलभूत गरजांसाठी वा अशाच खऱ्या गरजेच्या व अत्यावश्यक गोष्टींसाठी जेव्हा बंडखोरी करता तेव्हा ती उपयुक्त असते. ती शिक्षणाकरता असो, कमी वयात लग्नाला विरोधापासून असो...!!