आजच्या जगात वावरताना ठामपणा हा फार गरजेचा घटक आहे. तुम्हाला भलेही तुमच्या स्वप्नांचा, ध्येयाचा विशिष्ट मुद्दा एखाद्या व्यक्तीला समजावता नाही आला तरीदेखील तुम्ही आपल्या ध्येयाप्रती असलेल्या त्या मुद्यावर ठाम राहून त्या मुद्द्यावर अधिक माहिती घेत राहून पुढे जात राहिलं पाहिजे. आधीच "मला इतकंही साधं जमणारं नाही वगैरे", बोलून स्वत:ला अकारण कमकुवत बनवू नये.
यशाच्या व्याख्येसंबंधी गैरसमज कधीच बांधू नका, प्रत्येक यशस्वी झालेल्या व्यक्तीचे अनुभव वेगळे आहेत त्यानुसार वेगळ्या व्याख्या तयार होत राहत आहेत. त्यात या सोशल मिडीयाच्या जमान्यात फारच भिन्नभिन्न प्रकार नव्याने रोज पहायला मिळतात. तुम्ही फक्त मेहनत, सातत्य, कौशल्य विकसित करणं, स्वत:ला योग्य वेळ देणं, स्वत:च्या अपयशाची कारणमिमांसा करून त्यावर विचारविनिमय करणं यावर ठाम रहा. एक दिवश यशाला तुम्हाला गवसणी घालावीच लागेल.
प्रत्येक माणसात राग हा असतोच. ज्याला भावना आहेत तो साहजिकचं रागावणार. पण या रागाला/क्रोधाला मर्यादा असणं गरजेच आहे. अन्यथा तुमचा रागीट/तापट स्वभाव इतरांपासून तुम्हाला दूर लोटू शकतो.
तणावाला घाबरून अस्वस्थ होणं याला पर्याय शोधा, तुमचा मेंदू तुमच्याकडून अनेकदा संकटात वा तणावात अधिक प्रभावीपणे कार्य काढून घेऊ शकतो. फक्त सरावानुसार तुम्ही स्वत:ला तणावात त्या योग्य पद्धतीचा माईंड-सेट ठेवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे तणावाला कमजोर बनवण्याऐवजी ताकदीचं साधणं बनवायला शिका.
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
जीवन एका प्रवाहासारखं आहे, त्यामुळे तुम्ही एकाच विचारात, एकाच साखळी अडचणीत, एकाच दिशेत फारसं स्वत:ला अडकवून ठेवून गुंता आणखी क्लिष्ट व फार किचकट करू नका. अनेकदा तुमच्या संकटांची गुंतागुंत ही तुम्ही मानसिकरीत्या त्या घटनांकडे कशा नजरेने पाहता यावर अवलंबून ठरते. एकेका गोष्टीला हळूवार एकेक पाऊल उचलून नष्ट करत चला. हळूहळू आपोआप एखाद्या क्लिष्ट साखळीतुनही बाहेर यालं.
जेव्हा धैर्य एका टप्प्यावर भरपुर खचत तेव्हा इतरांपाशी व्यक्त व्हायला जमत नसेल तर स्वत:शीच व्यक्त होणं अधिक गरजेच असतं. आपल्या डोळ्यासमोरील परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वत:च्या आधीच्या जिवणात तुम्ही सामोऱ्या गेलेल्या संकटांची आठवण करून त्यांना स्वत:पाशी व्यक्त करा, कटू आठवणींना उराशी कवटाळून रडा हवं तर पण त्यातुन भुतकाळात तुम्ही सावरला होतात हेही पुढे स्वत:ला आठवण करून द्या. आणि हळूहळू स्वत:लाच खंबीर करत एकेक दिवस मनाचं धैर्य वाढवायला लागा.