तुमच्या मनातले आणि खरतरं तुमच्या स्वत:चे तुमच्याच विरूद्ध चालणारे अनेक संघर्ष तुमच्या वाट्याला येत असतात. त्यात द्विधा प्रश्नांवर मन खोळंबत, कधी निर्णय लवकर घेता येत नाही, कधी उगाच हरवून गेल्यासारखं वाटतं आणि तसचं राहवं वाटतं, वास्तविकताच नकोशी वाटते; मुळात हा संघर्ष असतो तो स्वत: विरूद्धचं पण त्याबाबतीत कधीच कोणी काहीही शिकवत नाही, कधी कोणी आपल्याला त्याविषयी सल्ले वा माहितीही देत नाही त्यामुळे अशा संघर्षांना थोडं सामंजस्य बाळगत हळूवारपणे सामोरं जाण्याचा प्रयत्न करत चला.
खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका.
बुद्धीला व्यापक दृष्टिकोन शिकण्यासाठी त्याला समोर आव्हाने व संकटेदेखील तशीच हवी असतात. ज्या गोष्टी, जे ध्येय तुम्हाला स्वत:च्या सद्यस्थितीत असलेल्या कौशल्यांपेक्षा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करायला भाग पाडत असतील तर ते नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्हाला विकसित करत आहेत. आणि याच वाटेने तुमचं ध्येय तुम्हाला अधिक प्रगल्भपणे भेटणार आहे, जिथे पोहोचल्यावर कायम स्थिरता असणारचं आहे. कारण तुम्ही त्या वाटेवर पन्नास टक्केंपेक्षा अधिक सक्षमपणे उभे असता.
कधीकधी ध्येयाच्या अंतीम टप्प्यापर्यंत पोहोचण्याकरता वाटेत येणारे मिसिंग डॉट्स भरायचे असतात. हे मिसिंग डॉट्स शोधायची दृष्टी थोडी प्रगल्भ करता यायला हवी इतकाचं मुद्दा असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला गायक व्हायचंय पण त्याआधी थोडेसे गाणे कंपोझ करता येतायेत तर कंपोझिशनमधे इंडस्ट्रीत मोठी जागा रिकामी असेल तर अर्थात ती मिसिंग डॉट आहे. अन तो तात्पुरत्या वेळेकरता तुम्ही भरू शकलात तर पुढे चालून मुख्य गायकी ध्येयही आत्मसात करता येतं. ही टेक्निक विविध क्षेत्रात विविध पद्धतीने वापरावी. अभ्यासात एखादा टॉपिक अधिक मार्कांचा असला अन पर्यायी (ऑप्शनल) दुसरे दोन छोटे टॉपिक त्याच लेव्हलला असतील वा थोडं अधिक असेल तर तेच दोन टॉपिक करणं म्हणजे मिसिंग डॉट्स भरून पुढे जाणं.
निर्णय फार महत्वाची भुमिका आपल्या आयुष्यात बजावत असतात, अनेकदा शक्यतो आपल्याला ऐकायला पडतं "तुझा निर्णय चुकीचा होता". पण हे आयुष्य आहे, इथे निर्णय आधी घ्यावेच लागतात आणि नंतर त्यांना योग्य सिद्ध करावं लागतं. ते निर्णय खरे होते, हे सिद्ध करताना तहानभूक हरपली पाहिजे आणि जे सिद्ध करायचयं त्या ध्येयाप्रती मनात अगदी प्रचंड ओढ निर्माण झाली पाहिजे.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा , स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ, आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
तिरस्कार हा एकतर मनाला पेटून उठवण्याचं कार्य तरी करू शकतो किंवा तो मनाला नकारात्मक बुद्धीने वागायला प्रवृत्त तरी करू शकतो; माणसाच्या वृत्तीत सारेच गुण सामावलेले असतात तो कधीतरी चुकून एखाद्याचा तिरस्कार करू शकतो पण मग या केलेल्या तिरस्कारातून आपणच इर्षेने पेटून नव्याने ध्येय गाठण्याची प्रेरणा स्वत:ला दिली पाहिजे.