अनेकदा आपण शक्यतांचा आधार घेत पुर्व अंदाजानुसार आपले ध्येयातील टप्पे ठरवत असतो, दरवेळी त्या टप्प्यांच्या हिशोबतच गोष्टी होतील अशातला भाग नाही. कधी एखादा टप्पा फार तीव्र स्वरूपाची कठीणाई निर्माण करू शकतो, त्यात मानसिक खच्चीकरण होऊ शकतं पण म्हणून कधी स्वत:च्या चालू वाटचालीवर शंका घेत ध्येयाबद्दल डगमगू नका.
कामाशी मग्न होता आलं पाहिजे. अनेकदा माणुस किंचितशा केलेल्या कामाचा अतीपणा करून स्वत:च्या साऱ्याच क्षमतांना कमी करू लागतो. त्याच्या नकळत त्याच्यात आळस व सोबतच अहंकाराचे प्रमाण वाढू लागते. थोडं जरी केलं तरी त्याचं त्याचा क्रेडिट हवंहवंसं वाटू लागतं. अशी माणस काळाबरोबर आपोआपच लुप्त होतात. त्यांची दखल इतिहास घेत नाही
जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
भरकटू नका. बऱ्याचदा भविष्यात कायमस्वरूपी स्थैर्य देणाऱ्या गोष्टी या सुरूवातीच्या टप्यांवर प्रचंड वेळ घेत राहतात; त्यावेळी अशा परिस्थितीत मन:स्थिती अगदी एकरूप, संघटित व घट्ट प्रमाणात एकवटून ठेवावी लागते. टिकवलेल्या मनाच्या धैर्याचा, आपल्या दिशेचा, आपल्या योजनांचा बांध हा फुटू द्यायचा नसतो. एक, दोन प्रयत्न वा योजना जरी चुकल्या तरी दिर्घ ध्येयाकडे जाणारी योजना ही सखोल व्यापक असते इतकं लक्षात ठेवा.
ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
कोणतीही सवय जी तुम्ही शरीराला लावता अथवा मनावर बिंबवता त्यातून प्रभावीपणे एका दिशेची वाटचाल घडत जाते. त्यामुळे दैनंदिन जीवण जगताना स्वत:च्या छोट्याशादेखील गोष्टींची नोंद स्वत:च्या विचारांमधे घेऊन पुढे वाटचाल करत रहा.
चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.