तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे..
हेवेदावे तेव्हाच करावे जेव्हा अगदीच अती टोकाची परिस्थिती समोर असेल. अन्यथा नको तिथे हेवेदावे करत बसलात तर वेळ, क्रोध, मनातलं शल्य या साऱ्याच भावनांचा आवेग शुन्य होऊन आपल्या पदरी निराशा पडते.
आपल्या अंतरंगात कधीतरी क्रोधाची भावना निर्माण होणं हे नैसर्गिक आहे. पण आपल्यामधे एखाद्याबद्दल कटुता वा अगदीच तीव्र तऱ्हेची द्वेषाची ठिणखी कधीच पेटू नये. कारण या नकारात्मक गोष्टींनी आपणच आपल्यातलं असलेलं कौशल्य, आपलं चैतन्य, आपल्यातील तजेलदारपणा हे नकळतपणे नष्ट करत असतो. त्यामुळे अगदीच इतरांबद्दल सहसा वाईट तर नकोच पण विचारही न करता आपला मार्ग दवडत रहायचा इतकचं!
कधीकधी जिवण जगताना तुम्हाला एखादा ब्लॉक येऊन जातो, हा ब्लॉक थोडक्यात विचारांमधील अडथळा किंवा आपल्याला काही केल्या सुचणं किंवा पुढे विचार करणचं कठीण होऊन बसतं. मग अशावेळी अनेकदा फिरणं, मनमोकळ्या गप्पा करणं, किंवा काहीतरी हलकेफुलके कार्यक्रम पाहणं यांसारख्या काहीतरी गोष्टी आपण करतो. पण मुळात ब्लॉक आलाच तर अशी गोष्ट करा जिथे तुम्ही आनंदी स्वतःच मन रमवू शकाल, तेव्हाच तो विचारांचा अडथळा दुर होतो. उगाच केवळ याने त्याने सांगितलेल्या गोष्टी करून न पाहता स्वत:ला मनातून एखादी कराविशी वाटणारी गोष्ट करा.
शब्दांच्या मधलं बरचं काही समजून घ्यावं अशी अपेक्षा असते, माणूस निसर्गत: तेवढा चमत्कारिक नाहीये, त्यामुळे मला वाटतं मनात असेल ते बोलून मोकळं व्हावं. उगाच एखाद्याच्या मनावर टांगती तलवार फिरवणं जरा चुकीचचं. त्यामुळे संवादांमधून नात्यांमधे स्पष्टोक्तेपणा आणणं फार गरजेच आहे. आपण अनेक नात्याबद्दल अनेकदा समजुन न घेता, उघडपणे न बोलता जे आतल्या आत दाबून ठेवतो त्या गोष्टींनी नाती संपुष्टात येतात कारण आपल्यात संशयाचा अकारण घेरा अशाने वाढत जातो.
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.