जिवणाला फार कटीबद्ध करू नका. नियम लावून विनाकारण स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला हरवू नका, शिस्त जरुर असावी पण नियमांचा अतिकाटेकोरपणा जगण्यातला आनंद हिरावून घेतो याचीही जाणिव ठेवा.
तुमचे गट्स अर्थात तुमचा धैर्यपणा, हिम्मत ही गोष्ट अतीशय महत्त्वाची ठरते. एखादा निर्णय घेताक्षणी, एखाद्या ठिकाणी अडचणीत जरी पडू लागलो तरी हिमतीने मी सर्व सारुन नेईन हा ठामपणा दाखवणे, या गोष्टीच तुम्हाला सर्वार्थाने आयुष्याच्या इतर कोणत्याही प्रचंड संकटातून वाचवत असतात. त्यामुळे गरजेच्या वेळी गट्स बाळगले पाहिजेत थोडक्यात हिम्मत बाळगली पाहिजे.
अति लालसा अर्थात अतिलोभ हा तुमच्या स्वत:तील चांगुलपणाला आणि निरागसतेला नष्ट करून टाकतो. आपल्या आजुबाजुला अनेकदा वाईट लोकांची गाठ आपल्याला पडते परंतु त्यांच्याशी बुद्धिने विवेकाला शांत ठेवून आपण वागू शकलो तर आपण आपल्या प्रगतीकडेच एकप्रकारे वाटचाल करत असतो.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा , स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ, आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
अचानक कधीतरी जेव्हा मन सैरभैर होतं, विचारांच्या तर्कशुद्ध वाटा बंद झाल्याचा भास होऊ लागतो, क्षणोक्षणी आणि पुर्ण दिवस अथवा रात्रभर एक नकारात्मकता उगाच मनभर पसरली जाते; आयुष्यात नकळत घडलेल्या काही चुका आठवून मन थोडसं धासळलेल्या परिस्थितीत जातं; तेव्हा आपल्यात साचलेली नकारात्मकता ही अश्रूंवाटे मोकळी करून द्यावी. माणुस जर जीवनात ध्येयांकडे एक उर्जा घेऊन नेहमी आजवर चालत आला असेल तर त्याच्या अंतर्गत भागात तेवढी नकारात्मकता साचतं राहणं हे नैसर्गिक आहे. म्हणून आधीच्या चुकांकडे, काही जुन्या निर्णयांकडे पुन्हा एक केवळ गेलेली संधी म्हणून पाहत अश्रूंवाटे त्यांना वाट मोकळी करून दिल्यास नव्याने पहाटेच्या प्रहरीचा आशेचा किरण शोधता येणं शक्य होतं.
स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे, समोरच्यावर टीका करणं.