आज मी तिला कायमचा विसरण्यात यशस्वी झालो.. आज मी तीची दिवसात फक्त, दोनदाच आठवण काढली, एक म्हणजे श्वास घेतांना, आणि दुसरी म्हणजे, श्वास सोडतांना..

आज असं वाटतंय की तू आज माझ्या Life मध्ये, हवा होतास…

प्रेम म्हणजे डोळ्यासमोर झालेली चोरी पण हि चोरी नेमकी कधी होते कशी होते समजतच नाही आणि जे चोरीला गेल आहे ते परत मागवसही वाटत नाही आणि ज्यांनी ते चोरलय त्याल्या भेटल्या शिवाय चैनच पडत नाही......

गरज आहे आज मला.. त्या तुझ्या आधाराची अडखळनारे पाऊल माझे सावरणाऱ्या तुझ्या हातांची गरज आहे आज मला... त्या तूझ्या मोहक मिठीची दडपण असता या मनी तुझ्यात स्वतःला सामावून टाकणाऱ्या त्या बाहूंची गरज आहे आज मला.. त्या तुझ्या कोमल प्रीतीची भय दाटताच या मनी आपलेपणा देणाऱ्या त्या तुझ्या स्पर्शाची गरज आहे आजहि मला.. माझ्यावरच्या त्या तूझ्या निस्वार्थी प्रेमाची सारे जग असुरक्षित वाटताच तू जवळ आहेस या जाणिवेची गरज आहे मला खूप गरज आहे... मला तुझी खूप आठवण येते .....

नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस, .नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस, नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस, नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको, नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,

छापा असोवा काटा असो... नाणे खरे असावे लागते... प्रेम असो वा नसो... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात....

"शाळेमध्ये त्यांनी मला शिकविले कि १ तास = ६० मिनिट १ मिनिट = ६० सेकंद पण त्यांनी मला कधीच सांगितले नाही कि १ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे ......." Miss you

तुझ्यासाठी प्रत्येकवेळी मन वेडे रडलंय, पण आता त्या आभासमय पाखराला त्याच्या क्षितीजावर सोडलय पावलांच्या उगीच बहकन्याला कधीच सावरलय, वेड्या माझ्या मनालाही तेव्हाच आवरलंय...!!!

आजही पुन्हा तेच झाले डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले.. आजही पुन्हा तेच झाले मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले ... येताच आठवण तुझी मनाला माझ्या खुप सावरले तरिही पुन्हा तेच झाले सर्व जुने पुन्हा नवे झाले.. कुणी नाही तु माझी मनाला माझ्य खुप समजावले तरिही पुन्हा तेच झाले मन तुझ्याविना उदास झाले.. जगायचे आयुश्य सुखात अनेकांनी सांगुन पाहिले तरिहि पुन्हा तेच झाले तुझ्याविना हे आयुश्यच नकोसे झाले..

आज माझ्या डोळयांच आणि हृदयाच कडाक्याचं भांडण झालं आहे भांडणाचे कारण म्हणजे ," नेहमी तू हृदयात राहतोस , पण ह्या नाजूक आसुसलेल्या डोळ्यांमध्ये मात्र कधीच नसतोस "