Motivational Status in Marathi

309 Motivational Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook

New Alone Angry Attitude Birthday Breakup Brothers Cheat Crush Emotional Festivals Friends Funny Good Morning Gym Happiness Heart Touching Independence Day International Friendship Day Life Love Mahakal Miss U Motivational Rain Sad Selfish Single Sisters Sorry Thanks
 

ध्येयाची निश्चिती ही गोष्ट फारच कणखर आणि प्रखंड तपश्चर्येची कस घेणारी गोष्ट असते. त्यामुळे सुज्ञ होत असताना आपण विविध गोष्टींच आधी पुरेपुर ज्ञान घेऊन त्यात कितपत उडी मारणं आपल्याला शक्य होणार आहे हे तपासून ते निवडणं फार महत्वाचं. उगाच या क्षणी घेतलेला निर्णय नंतरच्या क्षणाला खोटा किंवा उगाच घेतला असा वाटू नये.

किरण पवार (अंशु)

आपल्यासमोर प्रत्येक गोष्टींना एकाच दृष्टीच्या विचारांचा चश्मा लावून पहायची सवय कधी लावू नका. प्रत्येकवेळी तुम्ही आधीच विचार करून ठेवला असेल तशीच अमुकतमुक गोष्ट घडलेली असावी हे गरजेच नाही. खरतरं हे एखाद्या उदाहरणाखातर लागू पडतं असं नाही. तेव्हा अनेकदा अनेक गोष्टींचे विविध बाजूंचे पैलूही विचारात घेत चला जेणेकरून पुढील भविष्यात काही जुन्या गोष्टींचा कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. दृष्टीक्षेप फार महत्वाचा.

किरण पवार (अंशु)

शंका सहसा तुमच्या यशाकडे जाणाऱ्या मार्गावरील अडथळ्यांना आणखी बळकटी देतात आणि त्यामुळे शंकेसहित केलेल्या प्रयत्नांमधून अपयशाची पाऊले तुमच्या पदरात पडू लागतात तेव्हा कायम खंबीर आत्मविश्वासाने हर एक प्रयत्न सातत्याने सुरू ठेवा. शंकेची मनात चुकचुकणारी पाल ही नेहमी एक वाईट वृत्ती आहे.

किरण पवार (अंशु)

नियोजन ही फार गांभिर्याने घेण्याची गोष्ट आहे. तुम्ही थेट आठवड्याभराच जरी काही ठरवू शकत नसाल तरी रोजच्या दिवसभरात आज या वेळेत एवढ्या कामाची पुर्तता करायची म्हणून छोट्या टप्यात विभागणी करत ती पार पाडली तर कोणताही अपव्यय झाल्याचा मनःस्ताप होत नाही आणि मनही स्थिर राहतं.

किरण पवार (अंशु)

अनेकदा मन कधीतरी अचानक मधेच अस्थिर आणि शांत बनून जातं; हे आपोआप घडतं भलेही तुम्ही फार सकारात्मक स्वभावाचे व्यक्ती असलात तरी हे होतं... अशात उत्तर मिळत नाहीत व आपल्यापुढे प्रश्न काय आहेत याचाही निट ठाव घेता येत नाही. त्यामुळे स्वत:ला काही निवांतपणात झोकून द्यावं. तो निवांतपणा म्हणजे जगण्यात एके दिवशी आलेला रिफ्रेशमेंटचा भाग असतो. ज्याने नंतर उर्जा मिळतेच मिळते.

किरण पवार (अंशु)

तुमच्या मनातील नव्या योजना, कल्पनाशक्ती किंवा इतर काही प्रकल्पांच्या ज्या प्रथमदर्शनी गोष्टी असतात त्या इतर लोकांच्या नजरेत प्रथमत: चुकीच्या ठरू शकतात कारण त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांनी कधी एखादा तशा प्रकारच्या योजनांना जिवणात साकार झालेला प्रवाह कधीच पाहिलेला नसतो. त्यामुळे, तुमच्या योजनांना कोणाच्या सल्ल्याने ऐकून त्यांना थांबू देऊ नका. काम करत रहा, ऊजेडात त्यांना चुकीची प्रचिती होईलच.

किरण पवार (अंशु)

प्रत्येकाची कुवत आणि आपापल्या आकलन क्षमता या वेगवेगळ्या असतात; त्यामुळे एखादा इतक्या प्रचंड प्रमाणात प्रयत्न करतोयं, मी तितक्या प्रमाणात काहीच करत नाही वगैरे म्हणतं स्वतःला कमी लेखाची गरज नाही. अशाने अकारण आपल्याला न्युनगंड तयार होऊ लागतो.

किरण पवार (अंशु)

"संयम" या शब्दाइतकी जमेची दुसरी कोणतीही बाजू नाही. तुम्ही आपल्या आत धगधगणाऱ्या ज्वालांवर जितका अंकुश ठेवालं आणि त्या ज्वालेला संयम बनवून सातत्याने विजयाकडे जेव्हा एकेक पाऊल टाकालं; तेव्हा भविष्य तुमच्या यशाची हमी नक्कीच तुमच्यासाठी खास राखून ठेवेलं.

किरण पवार

अचानक कधीतरी जेव्हा मन सैरभैर होतं, विचारांच्या तर्कशुद्ध वाटा बंद झाल्याचा भास होऊ लागतो, क्षणोक्षणी आणि पुर्ण दिवस अथवा रात्रभर एक नकारात्मकता उगाच मनभर पसरली जाते; आयुष्यात नकळत घडलेल्या काही चुका आठवून मन थोडसं धासळलेल्या परिस्थितीत जातं; तेव्हा आपल्यात साचलेली नकारात्मकता ही अश्रूंवाटे मोकळी करून द्यावी. माणुस जर जीवनात ध्येयांकडे एक उर्जा घेऊन नेहमी आजवर चालत आला असेल तर त्याच्या अंतर्गत भागात तेवढी नकारात्मकता साचतं राहणं हे नैसर्गिक आहे. म्हणून आधीच्या चुकांकडे, काही जुन्या निर्णयांकडे पुन्हा एक केवळ गेलेली संधी म्हणून पाहत अश्रूंवाटे त्यांना वाट मोकळी करून दिल्यास नव्याने पहाटेच्या प्रहरीचा आशेचा किरण शोधता येणं शक्य होतं.

किरण पवार

आजच्या जगात वावरताना ठामपणा हा फार गरजेचा घटक आहे. तुम्हाला भलेही तुमच्या स्वप्नांचा, ध्येयाचा विशिष्ट मुद्दा एखाद्या व्यक्तीला समजावता नाही आला तरीदेखील तुम्ही आपल्या ध्येयाप्रती असलेल्या त्या मुद्यावर ठाम राहून त्या मुद्द्यावर अधिक माहिती घेत राहून पुढे जात राहिलं पाहिजे. आधीच "मला इतकंही साधं जमणारं नाही वगैरे", बोलून स्वत:ला अकारण कमकुवत बनवू नये.

किरण पवार

जिवण उत्कट आहे आणि ध्येयाकडे जायच्या वाटाही अगणित आहेत. त्यामुळे कधी एखादा ठरवलेला मार्ग काही कारणास्तव बंद झालाच तर निरास होऊन त्याची पाटी गिरवत बसण्यात अर्थ राहत नाही. नाउमेद माणसाकडून त्याच्यातली बरीच क्षमता काढून घेते, त्यामुळे संयम बाळगत नव्या दृष्टीकोनातून विचार करायला शिकलं पाहिजे.

किरण पवार

किमान चारदोन निवडीची लोकं सोबत असावीतच कायमसाठी. कारण अंधारात, एकट्याच्या संघर्षात कुणी नसल्याची उणीव फारशी पोकळी मनाला जावणत नाही पण जेव्हा विजयात कुणीच सामिल नसतं, तेव्हा प्रचंड त्रास होतो. कारण मानवाला मुळ स्वभावत:च एखादी तरी संगत गरजेची असते, मानव हा एकलकोंडा स्वभावाचा नसतो.

किरण पवार (निनावी)