309 Motivational Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.
सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता, त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते, अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि, जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळत, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.
आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.