Motivational Status in Marathi

309 Motivational Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook

New Alone Angry Attitude Birthday Breakup Brothers Cheat Crush Emotional Festivals Friends Funny Good Morning Gym Happiness Heart Touching Independence Day International Friendship Day Life Love Mahakal Miss U Motivational Rain Sad Selfish Single Sisters Sorry Thanks
 

जिवणाची विविध गुपितं आपल्याला तेवढ्या सहजासहजी समजून घेता येत नसतात. आपण स्वत:च्या नकळत कितीतरी गोष्टी दैनंदिन जिवणात स्वत:च्या आकलन शक्तीमधे मिसळत असतो. याचा ठाव आपल्याला तितकासा नसतो अन एके दिवशी जेव्हा एखादं काम करताना आपल्याकडून ती गोष्ट बाहेर पडते तेव्हा आपणच चकीत होतो की आपल्याला ते काम जमलं आहे. याचा अर्थ तुमचं निरीक्षण, तुमचं एखाद्या गोष्टीकडे सहजरीत्या पाहणंदेखील तुमच्या आकलनशक्तीचा भाग होतं. त्यामुळे कितीही गंभिर प्रसंग आले तरी लक्षात ठेवा त्यातून बाहेर पडण्याचं तंत्र हे तुमच्याच विचारांमधे सामावलं आहे.

अंशुलिखित

आपल्याला अनेक गोष्टींच्या पाठीमागचे अर्थ उलगडता येत नाहीत म्हणून भरपुर घोटाळा होतो. कारण जर हे अर्थ कळले असते तर आपण चुकीच्या दिशेत दिलेला वेळ, दिलेलं कार्य कदाचित थांबवू शकलो असतो. अन गेलेल्या मेहनतीची आपल्याला हळहळ व्यक्त करावीशी नसती वाटली असं वाटून जातं. त्यामुळे अनेकदा काही गोष्टींची शहानिशा ही खात्रीशीर व रोखठोक स्पष्टपणे करावी, अर्धवट माहिती वा अमुकतमुक म्हणतोयं म्हणून काहीतरी करणं हे चुकीचचं आहे.

अंशुलिखित

काही घटनांच्या जखमा या अनेकदा विचार करुनदेखील पुसता न येण्यासारख्या होऊन जातात. जखम मनावर इतक्या गंभीरतेने हावी होऊ लागते की मन खचत जाऊ लागतं. अन नैराशाच्या वाटेवर प्रवास सुरू होतो. नैराश्यात माणसाचं मन असं बंदिस्त होऊन जातं की त्याला बाह्यगोष्टींचा कितीही प्रभावीपणा दाखवा ते मनाच्या अंतर्गत लढाईखेरीज बाहेर येत नाही. त्यामुळे सहसा रोज स्वत:ला गरजेच असेल इतकं हसरं, मनमुराद, निखळ व सहज जगण्यासारखं ठेवत चला. मनाला छोट्या गोष्टींचा आनंद देत चला. ज्यामुळे एकतर नैराश्य फार येणार तरी नाही किंवा आलचं तर आजवरच्या प्रवासातील तुमच्या मनाने केलेल्या खंबीर वाटचालीची त्याला पुन्हा आठवण करून देत त्यातून बाहेर पडा. मोकळे फिरा, वाचण करा, स्वैराचार करत रहा, सिनेमे चिक्कार पहा... नवे दृष्टीकोन नवं जग त्यातून कळतं.

अंशुलिखित

विचारांमधे शांतता निर्माण झाली पाहिजे. विचार ठराविक असावेत, प्लॅनिंगच्या दिशेने त्यांची वाटचाल असावी. जेणेकरून मेंदूत विचार कमी व अधिक शांत असतील तेव्हाच आयुष्याचा प्रवाह हा गतीशील व स्थैर्य निर्माण करून चालत राहतो.

अंशुलिखित

मित्रमैत्रिणी हे असावेत, त्यांची आयुष्यातली जागा कोणीही घेऊ शकत नाही. ते तुम्हाला प्रोत्साहन देऊ शकतात, कधी मुड खराब झाला तर तेच तुम्हाला नव्याने खुलवतात... पण या सर्वांमधे एक गोष्ट झाकाळून जाते ती म्हणजे मित्रमैत्रिण दरवेळी हितचिंतक नसतात किंवा त्यांचा स्वभाव जरी वाईट नसला तरी त्यांच्या आस्तित्वाच्या आपल्या आयुष्यात तोटा नकळतपणे होत राहतो. अहंकारी असतात, बाष्कळ गोष्टी व घडामोडींना वेळ देणारे असतात... स्वत:हून कधीच मुद्याच्या गोष्टींवर विशिष्ट चर्चाही करणार नाहीत, अशा तऱ्हेचे. अन वेळ निघून जात आली की लक्षात येतं, आपल्याला काहीजण सांगायचे की संगती नीट विचार करून कर. तेव्हा ही बाब आवर्जून लक्षात ठेवून मैत्रीचे ठोकताळे ठरवत जगत चला.

अंशुलिखित

अनेकदा तुम्हाला तुमच्यात असलेल्या खास गुणांना वेळोवेळी विकसित करत चलावं लागतं. अनेकदा असं होतं की काही गुण तुमचे जवळचे लोक तुम्हाला सांगतात तेव्हा ते तुम्हालाच चकीत वाटू लागतं. तर अशावेळी तुम्ही त्या खास गुणांना शोधलं पाहिजे अन सहजता येईल असा त्यांचा रोज वापर करून त्यांना स्विकारलं पाहिजे.

अंशुलिखित

अनेकदा काही गोष्टी चालू स्थितीत तुमच्या बाजूने घडत नाहीत किंवा त्या घडायला काही वेळ हा जात असतो; अशावेळी नेमकं सध्याच्या पुढ्यात असलेल्या गोष्टींवर अधिक प्रभावीपणे लक्ष देत चला.

अंशुलिखित

आपल्यामधे चांगले गुण रोज अधोरेखित करून ठेवत चला. कधी जर नैराशाच्या कठोर काळात गुरफटला गेलात तर अशावेळी हेच अधोरेखित केलेले गुण त्यातून लवकर बाहेर पडायला मदत करतील.

अंशुलिखित

बुद्धीला व्यापक दृष्टिकोन शिकण्यासाठी त्याला समोर आव्हाने व संकटेदेखील तशीच हवी असतात. ज्या गोष्टी, जे ध्येय तुम्हाला स्वत:च्या सद्यस्थितीत असलेल्या कौशल्यांपेक्षा त्याच्या पुढे जाऊन काहीतरी करायला भाग पाडत असतील तर ते नक्कीच खऱ्या अर्थानं तुम्हाला विकसित करत आहेत. आणि याच वाटेने तुमचं ध्येय तुम्हाला अधिक प्रगल्भपणे भेटणार आहे, जिथे पोहोचल्यावर कायम स्थिरता असणारचं आहे. कारण तुम्ही त्या वाटेवर पन्नास टक्केंपेक्षा अधिक सक्षमपणे उभे असता.

अंशुलिखित

मनाला एकाग्रतेची सवय ही लावायला आपण शिकलं पाहिजे. मन अनेकदा शांत चित्त ठेवल्यावरच गांभिर्याने स्वत:बद्दलचे खरेखुरे विचार नेटकेपणाने करू शकतं. त्यामुळे मेंदूतील विचारांचा सततचा घणाघात सुरूवातील एखाद्या शांत ठिकाणी बसून कमी करावयास सुरूवात करावी. मेंदूतील नको असणारे विचार ज्या क्षणी सर्व एकेक करुन बाहेर पडत जातील तितका तुमचा ध्येयाप्रती असलेला विचार अधिक एकाग्र व ध्येयापर्यंतचा रस्ता खऱ्या अर्थानं व्यवस्थितपणे दिसू लागेल.

अंशुलिखित

जिद्दीला जोपासत राहणं खरं अधिक कौशल्याच काम असतं. जिद्द एकदा तयार झाली की तिथून पुढे तिची आस, तिचा टिकाव, तिचा संघर्षातील न होऊ देणारा पाडावं व त्या जिद्दीलाच सर्वस्वीपणे वाहून घेतलेला सर्वसमावेशक दृष्टीकोन हे सारंकाही तुमच्या ध्येयाप्रती असलेली एकत्र सांगड घालून विजयाच्या कार्यात मोलाचा वाटा बजावतात.

अंशुलिखित

आयुष्यात ध्येय गाठण्यासाठी सराव, सततची मेहनत आणि जिद्द या गोष्टींची गरज लागतेच. शिवाय तुम्ही तुमच्या दृष्टीकोनात सहजता आणायला हवी. अनेकदा ध्येय फार अवघड आहे, मी इथपर्यंत पोहोचेलचं का वगैरे करुन आपण नको तितका त्या गोष्टीचा धसका घेऊन कुठेतरी एक पाऊल नकळत आपलचं खच्चीकरण करत असतो. त्यामुळे शक्य तितकं ध्येय आपल्याला मिळवणं जमणार आहे याची सहजता विचारांमधे बाळगत चला. त्याने मन अधिक प्रबळ होईल.

अंशुलिखित