Motivational Status in Marathi

309 Motivational Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook

New Alone Angry Attitude Birthday Breakup Brothers Cheat Crush Emotional Festivals Friends Funny Good Morning Gym Happiness Heart Touching Independence Day International Friendship Day Life Love Mahakal Miss U Motivational Rain Sad Selfish Single Sisters Sorry Thanks
 

तणावाला घाबरून अस्वस्थ होणं याला पर्याय शोधा, तुमचा मेंदू तुमच्याकडून अनेकदा संकटात वा तणावात अधिक प्रभावीपणे कार्य काढून घेऊ शकतो. फक्त सरावानुसार तुम्ही स्वत:ला तणावात त्या योग्य पद्धतीचा माईंड-सेट ठेवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे तणावाला कमजोर बनवण्याऐवजी ताकदीचं साधणं बनवायला शिका.

किरण पवार (अंशु)

संघर्ष सुरू असतानाच्या काळात एखादी दैनंदिनी लिहित असालं तर त्यात रोज खचल्यावर इतकं स्वत:ला सांगत चला की, ही वेळ वाईट असली तरी तुम्ही धैर्यवान आहात. किंवा दैनंदिनी लिहत नसाल तरी एखाद्या रोजच्या अभ्यासाच्या वहीच्या शेवटच्या पानावर लिहून स्वत:ला ठामपणे बजावत चला.

किरण पवार (अंशु)

तुमच्याबद्दल इतर लोकांचे दृष्टीकोन गरजेचे ठरत नसतात. अनेक लोक आयुष्यात भरपुर चुका करून देखील सुधरू शकलेले आणि नव्याने आयुष्याची परिभाषा लिहू शकले आहेत. एक गुंड एका टप्प्यानंतर बॉक्सिंग चॅम्पियन होऊ शकतो, एक कैदी एक चांगला अभिनेता होऊ शकतो, एक चोर चांगला गायक होऊ शकतो. अशी प्रकरणे आज घडलेली आहेत त्यामुळे पुर्वआयुष्यावरून तुमच्याबद्दल इतरांनी लावलेल्या विचारांना फारस महत्व न देता नव्या दिशेत चालत रहा.

किरण पवार (अंशु)

राग वाईट गोष्ट असली आणि आपण तिला अनेक प्रसंगांमधे संयमाने घेण्याचा प्रयत्न दरवेळी करत जर असलो तर एखादवेळेस तो राग बाहेर पडणं गरजेच असतं. मानवी स्वभाव हा सर्वच भावनांना व्यक्त करण्यासाठी असतो. फक्त एवढी निश्चितता रागात ठेवावी की आपण एखाद्याला प्रमाणाबाहेर दुखावणार नाही. वा नुकसान करणार नाही.

किरण पवार (अंशु)

आपण अनेक संकट किंवा अडचणींना योग्य प्रकारे समजून घेऊन दुर करू शकतो. आपल्यामधे तेवढा समजुतपणा निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ही समजुत अधिक प्रगल्भ विचारांमधून आपल्याकडे येत जाते. त्यासाठी चुका, अनुभव, वाचण व कल्पनाशक्तीचा विकास योग्य दिशेत करत चला.

किरण पवार (अंशु)

माणुस भावनाविवश होतो तेव्हा कोणताही समंजस्यपणा कामी येत नाही. त्यामुळे एखाद्या अतीच खचलेल्या,भावविवश झालेल्या परिस्थितीतून स्वत:ला बाहेर येईपर्यंत मोकळा/निवांत वेळ घ्यावा नी नंतर कोणत्याही विषयावर अथवा गोष्टीवर विचार करावेत.

किरण पवार (अंशु)

अनेकदा आपल्याला संयम फार अधिक काळासाठी धरून ठेवता येत नाही. ते अशक्य होऊन बसतं पण या जिवणात चिरकाळ टिकणारं यश मिळवण्याकरता तो संयम तितका अधिक काळ बाळगणं गरजेच असतं. या काळात अपमान, नकारात्मक टोमणे, नको त्या गोष्टींच्या सतत ऐकू येणाऱ्या चर्चा हे सर्व विषप्राशन केल्याप्रमाणे जपुन ठेवावं. एक दिवस ते सर्वच परत करण्याची संधी येणार आहे.

किरण पवार (अंशु)

कधीकधी जिवण जगताना तुम्हाला एखादा ब्लॉक येऊन जातो, हा ब्लॉक थोडक्यात विचारांमधील अडथळा किंवा आपल्याला काही केल्या सुचणं किंवा पुढे विचार करणचं कठीण होऊन बसतं. मग अशावेळी अनेकदा फिरणं, मनमोकळ्या गप्पा करणं, किंवा काहीतरी हलकेफुलके कार्यक्रम पाहणं यांसारख्या काहीतरी गोष्टी आपण करतो. पण मुळात ब्लॉक आलाच तर अशी गोष्ट करा जिथे तुम्ही आनंदी स्वतःच मन रमवू शकाल, तेव्हाच तो विचारांचा अडथळा दुर होतो. उगाच केवळ याने त्याने सांगितलेल्या गोष्टी करून न पाहता स्वत:ला मनातून एखादी कराविशी वाटणारी गोष्ट करा.

किरण पवार (अंशु)

मन नेहमी प्रांजळ ठेवा इतकचं. स्वत:च्या ध्येयनिष्ठेशी इतके जुळले जा की इतर जगाकडे लक्ष द्यायची गरज वाटू नये.

किरण पवार (अंशु)

आयुष्यात कधी कोणत्या गोष्टींची तुलना करू नका. कधीकधी तुमच्या एका तुलनेनंतर, तुम्ही दुसरी- तिसरी आणि मग एकेका कोणत्याही गोष्टीत तुलनाच करायला लागता. तुमच्या छोट्याश्या तुलना करण्याच्या गोष्टींमुळे कधीकधी इतरांना त्रासही होऊ शकतो, कधीकधी तो त्रास तुम्हाला स्वत:देखील होऊ शकतो.

किरण पवार (अंशु)

आपण वेळीच सावरलं पाहिजे, आपण जिथे चुकत असू जिथे खचत असू तिथून शक्य तितक्या योग्य वेळी आपण सावरलं पाहिजे. सहसा आपलं सावरणं भविष्यातील आपल्या व्यक्तीमत्वाची पुर्ण प्रतिमा उभं करत असतं, आपल्याला एकेका अडथळ्यातून सावरायला जो वेळ आधी सहा महिन्यांचा लागत असेल पुढे तो एक महिन्यावर येतो, नंतर एका आठवड्यावर नंतर फार फार तर दोन तीन दिवसात तुम्ही स्वत:च नव्याने सज्ज व्हायला लागता. पण त्याकरता प्रथम वेळी नीटपणे सावरणं महत्वाचं आहे.

किरण पवार (अंशु)

अनेकदा आपण शक्यतांचा आधार घेत पुर्व अंदाजानुसार आपले ध्येयातील टप्पे ठरवत असतो, दरवेळी त्या टप्प्यांच्या हिशोबतच गोष्टी होतील अशातला भाग नाही. कधी एखादा टप्पा फार तीव्र स्वरूपाची कठीणाई निर्माण करू शकतो, त्यात मानसिक खच्चीकरण होऊ शकतं पण म्हणून कधी स्वत:च्या चालू वाटचालीवर शंका घेत ध्येयाबद्दल डगमगू नका.

किरण पवार (अंशु)