Status in Marathi

2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook

New Alone Angry Attitude Birthday Breakup Brothers Cheat Crush Emotional Festivals Friends Funny Good Morning Gym Happiness Heart Touching Independence Day International Friendship Day Life Love Mahakal Miss U Motivational Rain Sad Selfish Single Sisters Sorry Thanks
 

तुमच्या आजूबाजूला कितीही नैराश्य असेल किंवा तुम्हाला नकारात्मक विचारांमधून स्वत:ला बाहेर काढणं फारच कठीण जात असेल तर थोडासा स्वत:ला आवडेल अशा विषयांकडे लक्ष केंद्रित करा. कला जोपासा, वाचण करत रहा, ऑडीओ पॉडकास्ट ऐकत चला, मनोरंजन पहा, ज्या गोष्टी तुम्हाला स्वत:ला शोधण्यात मदत करतील त्या गोष्टीच तुम्हाला नकारात्मक विचारांतून बाहेर काढतील.

किरण पवार

जगण्यात मर्म कधी हरवू देऊ नका, तसं झाल्यानंतर जगण्याची पुढची दिशा ठरवता येत नाही. त्यामुळे एका ठराविक दिशेत यशापर्यंत पोहोचताना टप्पे निश्चित करावेत, प्रवास टप्प्या टप्प्यावंर केला की व्यवस्थित होतो. अडचणी जरा सोयिस्कर बनून जातात.

किरण पवार

अति लालसा अर्थात अतिलोभ हा तुमच्या स्वत:तील चांगुलपणाला आणि निरागसतेला नष्ट करून टाकतो. आपल्या आजुबाजुला अनेकदा वाईट लोकांची गाठ आपल्याला पडते परंतु त्यांच्याशी बुद्धिने विवेकाला शांत ठेवून आपण वागू शकलो तर आपण आपल्या प्रगतीकडेच एकप्रकारे वाटचाल करत असतो.

किरण पवार

निराशा ही अतिप्रेरणेची परिणामकारक गोष्ट ठरू शकते. एखाद्याने कमी वयात मिळवलेलं अफाट यश, एखाद्याने जिवणाबद्दल मांडलेले अवाढव्य सिद्धांत, एखाद्याने लिहलेले साहित्य, आधी कुण्या माणसाने रचलेले विक्रम; यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांना आदर्श जरूर मानावं पण कधीकधी अतिहावी होऊन आपण अतिप्रेरणेने स्वत:ला कमी लेखत खचून जाऊ शकतो; त्यामुळे आदर्श घ्यावा आणि सोबतच आपल्या स्वत:ला विकसित करण्याची संधीही सतत शोधत रहावी.

किरण पवार

प्रत्येक माणूस प्रगल्भ असेलचं ही शाश्वती देता येत नाही, अनेकदा अनेकांच्या मनात शंका - कुशंका निर्माण होण्याच सत्र चालूच असतं, माणसाने समोरच्यासोबत त्याचे विश्लेषण केलेच नाही तर... तर अनेक पैलू हरवून जातात, माणूस मैत्रीचा गंध हरवतो... माणसाला विचारांच्या आयामांची गरज नेहमीच वेगवेगळ्या टप्प्यांवर भासत राहते... माणसाने माणसाला समजून घेतलंच नाही तर अर्थ उरणार नाही... शेवट प्रत्येकाच आयुष्य निराळं आहे. प्रत्येकजण त्याच्या विश्वात रममाण आहेच की!

किरण पवार

आयुष्यात चार सुखाच्या सरींची बरसातही नव्याने एखादं कार्य सुरू करायला प्रेरणा देऊन जाते, त्यामुळे जर कधी मन खचलं तर एखादी आवडीची गोष्ट करायला घ्या, जी सकारात्मकेला तुमच्या आत पुन्हा भिनवू शकेल; ज्यामुळे पुढचं काम अधिक सोप्प होईल.

किरण पवार

आयुष्य अगदी दोन पावलांवर कायमच चाललेलं आहे;

निर्णय कोणताही घेताना धाकधूक होतेच म्हणा,

निर्णय फार महत्वाची भुमिका आपल्या आयुष्यात बजावत असतात, अनेकदा शक्यतो आपल्याला ऐकायला पडतं "तुझा निर्णय चुकीचा होता". पण हे आयुष्य आहे, इथे निर्णय आधी घ्यावेच लागतात आणि नंतर त्यांना योग्य सिद्ध करावं लागतं. ते निर्णय खरे होते, हे सिद्ध करताना तहानभूक हरपली पाहिजे आणि जे सिद्ध करायचयं त्या ध्येयाप्रती मनात अगदी प्रचंड ओढ निर्माण झाली पाहिजे.

किरण पवार (निनावी)

भावनांना मिटवण्यापेक्षा वाहू दिलेलं अधिक सोयिस्कर असतं, बऱ्याचदा दैनंदिन जीवनात गोष्टी मनासारख्या घडत नसतात अशावेळी स्वत:ला सावरण्यात अधिकाधिक वेळ खर्च करण्यापेक्षा एकदाच मोकळं होऊन लवकर पुर्वपदावर आलेलं कधीही उत्तम.

किरण पवार (निनावी)

जिवणात तुम्हाला जेव्हा तुमचा योग्य जोडीदार भेटतो तेव्हा गुण मिळणं महत्त्वाच नाही पण मनगटाला मनगट जुळणं फार गरजेच आहे. अर्थात एकमेकांनी प्रसंगी एकमेकांच्या कमतरतांना सांभाळून घेतलं पाहिजे. तर जोडीदारासोबतची कोणतीही वाटचाल यशस्वी होते.

किरण पवार

प्रत्येकाचा एक असा मित्र असतो जो आपल्याला वाक्यावाक्याला नकारार्थी बोलून, चुकून का असेना पण खच्चीकरण करत असतो. तर अशांच्या बोलण्याला फार महत्व न देता एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून बिनधास्त आपल्या योजनांवर ठामपणे लक्ष देऊन चालायचं.

किरण पवार

प्रत्येक माणसात राग हा असतोच. ज्याला भावना आहेत तो साहजिकचं रागावणार. पण या रागाला/क्रोधाला मर्यादा असणं गरजेच आहे. अन्यथा तुमचा रागीट/तापट स्वभाव इतरांपासून तुम्हाला दूर लोटू शकतो.

किरण पवार