Status in Marathi

2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook

New Alone Angry Attitude Birthday Breakup Brothers Cheat Crush Emotional Festivals Friends Funny Good Morning Gym Happiness Heart Touching Independence Day International Friendship Day Life Love Mahakal Miss U Motivational Rain Sad Selfish Single Sisters Sorry Thanks
 

दुसऱ्यांच्या चुकीमुळे जर तुम्हाला कधी एखाद्या अनुभवात पश्चाताप करायची वेळ आली, ते काम इतरांच्या दोषांमुळे चुकलं तर तुम्ही स्वत:च्या प्रामाणिक प्रयत्नांना दोष देऊ नये. नव्याने मार्ग शोधून आपल्या प्रयत्नांना ध्येयाकडे पुन्हा न्यावं.

किरण पवार

विचारांनी मन गजबजलेलं असतं तेव्हा नव्या विचारांकडे लक्ष द्यायची तसदी कुठलाच व्यक्ती घेत नाही; भिती असते, प्रश्न असतात, कंटाळा असतो आणि मुळात काय करता येईल हे संकट उभं असतं. अशावेळी जुन्या विचार, आठवणी यांच्याकडे पाठ फिरवून नव्या कल्पनेत आणि नव्या विषयात रममाण होता आलं की सारे प्रश्न मिटतात.

किरण पवार

आपण सतत एका संघर्षाला टाळतो तरी किंवा ते नाकारतो तरी, तो संघर्ष असतो स्वत:ला स्विकार करण्याचा. आपण माणुस म्हणुन 100% परिपूर्ण असावं हा अट्टाहास चुकीचा आहे. त्यामुळे आपल्यामधे गुण-दोष आणि काही इतरही बाजू आपल्यामधे समाविष्ट असणार आहेत. त्यामुळे आपण आपल्या स्वत:च्या संघर्षावरही विजय मिळवतं शक्य ते बदल करावेत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे चालावं.

किरण पवार

जिंदगीत एखादी गफलत होते, एखादा गैरसमज होतो, एखादी व्यक्ती दुरावते तर कधी एखादं नातं, पण शेवटी सुर्याला जसं अस्तापर्यंत जाऊन पुन्हा नव्याने यायचं असतं; आयुष्याची घडी तशीच बसवावी लागते अगदी नाईलाज असला तरी. काही निर्णय गंभीर आणि मन खंबीर; स्वत:ला तसं बनवावं लागतं.

किरण पवार (निनावी)

आज जग फार पुढे चाललयं, सारी माहिती गुगलवर झटक्यात मिळते. अशात एखाद्या नवख्या विषयावरची माहिती एखाद्या क्षणी एखाद्या व्यक्तीसमोर आपल्याकडून चुकीची सांगितल्या गेली किंवा चुकलीही समजा तर हरकत नाही; त्यात कमीपणा वाटून किंवा नंतर एखाद्या क्षणी आपल्यालाही कसं सार ठाऊक असतं, आपल्याही ते येतं असं दाखवायची गरज नसते. प्रत्येकाला सर्वच विषयातलं जगभरचं सारच ज्ञान असावं असं गरजेच नाहिये. आणि अनेकांना स्वत:चंच खरं असंही म्हणायची सवय असते तर त्यांना दुर्लक्ष करायचं.

किरण पवार

जर तुमच्यामधे धैर्यच नसेल तर सारकाही व्यर्थ ठरणार आहे हे लक्षात ठेवा; आणि धैर्य, हिम्मत या गोष्टी जन्मत: उपजत याव्यात हा अट्टाहास नसावा. आयुष्यात जडणघडण ज्या दिशेत होत जाते तेव्हांच्या अनुभवांमधून माणुस स्वत:ला कणखर बनवत जात असतो. तेव्हा धैर्य निर्माण होतं.

किरण पवार

अनेकदा इतर लोकांना तुमच्यावर मक्तेदारी किंवा तुमच्या छोट्या छोट्या विचारांवरदेखील प्रभुत्व गाजवायचं असतं. त्याच मुख्य कारण म्हणजे कधीकधी तुमचा स्वभाव हा इन्ट्रोवर्ट असतो, त्यामुळे तुम्ही तुमचा मुद्दा एखाद्याला नीट समवाजू शकत नसता तर अशावेळी इतरांचे विचार फक्त होकाराला होकार देत ऐकत रहायचं पण आपल्या ध्येयांबाबत आखणी करताना आपल्याला सहजसाध्य करता येईल अशा पद्धतीनेच करत रहायची.

किरण पवार

न घडलेल्या गोष्टी किंवा काही अनोखे प्रकल्प, अनोख्या युक्त्यांची अंमलबजावणी, अनोखे कार्य करण्यासाठी जो तोडगा आपण शोधू शकत असू. तो तोडगा उत्तम असेल यावर विश्वास ठेवून निसंकोचपणे पुढची वाट चालत रहा. संकोच मनातल्या योजनांना नष्ट करतो पण काहीतरी करण्यात साध्य झालेल्या चुका व त्यातली शिकवण या गोष्टी यशाच्या जवळील मार्ग खुला करत असतात.

किरण पवार

आपल्याजवळ संयम आणि हळूहळू एकेक प्रयत्नांमधून पुढे जाण्याची ताकद असली पाहिजे. आपण एका रात्रीत किंवा क्षणात परिपूर्ण कलाकृती किंवा परिपूर्ण काम पार नाही पाडू शकत. एखादं ऑलिंपिक मेडल एका रात्रीत प्राप्त झालेलं नसतं, त्यापाठी सातत्याने केलेलं प्रयत्न असतात. त्यामुळे कोणी कधी तुमच्या एखाद्या प्रयत्नाला चुकून चुकीच करतोय अथवा जमणारं नाही म्हटलं तर तिथेच थांबून समोरच्यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. एक दिवस तुम्ही स्वत:ला सिद्ध करताना हेच लोक टाळ्या वाजवतील.

किरण पवार

मन खंबीर असतं त्या क्षणांमधे विलक्षण ताकद असते, कितीही कंटाळा आला असेल, कितीही टेन्शन आलं असेल, कितीही अडचणी समोर दिसच असतील, तरी अशा वेळी मन मात्र त्या गोष्टींना झुगारून योग्य वाट शोधतचं.

किरण पवार

जराशीही किंमत नसलेल्या लोकांना मदत करायच्या भानगडीत पडू नका. अशा लोकांचा असा स्वभाव दोन भेटीगाठीत अथवा दोन एक चर्चेतच पुरेसा समजून येतो. मदत करायला हरकत नाही, पण नंतर दोष तुमच्यावर टाकूनही ते मोकळे होणारे लोकं असतात. त्यामुळं अशांना "तुमची वाट तुम्ही चाला", हेच शहाणपण शिकवायचं.

किरण पवार

आयुष्याला खळखळाट असण्याऐवजी संथता आणि नितळता असावी; म्हणजे जे शांत आणि कायम स्पष्ट असतं ते स्वभावालाही खुलवतं आणि आपल्याला ध्येयाजवळ जाण्यात मदतही करतं. स्वभाव हादेखील एक अप्रतिम दागिना आहे, ज्याने जग जिंकता येऊ शकतं.

किरण पवार