ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप भेटतील मला, मी पण हसून तिला विचारलं, आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.
काही लोक इतके नशीबवान असतात की, दुसऱ्यांना दुखावून ही, नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते, आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की, दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही, मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो.
एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं.
माहिती आहे तुझ्या नजरेत मला, काहीच किंमत नाही. पण माझी किंमत त्यांना विचार, ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.
माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते, कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर, आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर.
तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले, प्रेम कशाला म्हणतात, आणि सोडून गेली तेव्हा समजले, खरे प्रेम कशाला म्हणतात.
नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते, कितीही अहंकारी असाल तरीही, प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.
इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस, दूर आपण झालो कधीचे, प्लीज़… आठवणींत भेटू नकोस. झालंय ब्रेकअप तरीही, डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस. खरेच सांगू का तुला, माझ्या मनात तू आता राहू नकोस.
थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय, पण धन्यवाद ! तू इथवर आलीस, सारे आयुष्य नसलीस तरी, चार पाऊले माझी झालीस.
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल, जर तू माझ्याशी प्रेम करशील तर, मी तुझ्या हृदयात असेल, अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर, मी तुझ्या मनात असेल.
कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.
तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर. ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती.