2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.
जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.
तुझ्या अशा फसवणुकीने, मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास, ओळखीच्या माणसाशी देखील, आता तयार नसते बोलण्यास.
तुझ्या येण्याच्या चाहुलीने अजूनही तिथेच उभा राहतो, जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो.
माझ्यापासून दूरच जायचंय, तर खुशाल जा. फक्त एवढंच लक्षात ठेव, पुन्हा मागे वळून बघायची मला पण सवय नाही.
जाता जाता ती सांगून गेली, काळजी घेत जा स्वतःची, पण तिचे डोळे सांगत होते की, आता माझी काळजी कोण घेणार ?
कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून.
प्रेम त्याच्यावर करा, ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे, कारण ह्रदय तुटण्याचे दुःख, त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.
तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं, पण माझ्यासाठी खूप कठीण आहे, तुला विसरून जगणं !
आज मला खूप रडावसं वाटतंय, स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय, भरलेल्या डोळ्याने आरश्या समोर बसावसं वाटतंय, अन आपलं कोणीच नाही म्हणून, स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय.
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी.. हिशोब उरलाय तो फक्त, तू दिलेल्या जखमांचा.
जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत.