2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात.
जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी.. पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का, खेळण्यासाठी.
मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि, मन तुटायला हि वेळ लागत नाही. वेळ लागतो फक्त, ते गुंतलेले मन आवरायला आणि, तुटलेले मन सावरायला.
रहा तु कुठेही, पण जप मात्र स्वतःला. आडोशाला उभे राहून, पाहीन मी तुझ्या सुखाला.
कधी कधी खूप दूर पर्यंत जावं लागतं.. हे बघण्यासाठी कि, आपलं जवळचं कोण आहे.
मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं, ही तुझी इच्छा होती आणि, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, ही माझी इच्छा होती !
गळून गेलेल्या पाकळ्या जशा पुन्हा जुळत नाही, तसेच मनातून उतरलेले काहीजण पुन्हा मनात भरत नाहीत !
गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं, फरक फक्त एवढा आहे ? तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं, अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं.
आज माझ्याच सावलीला विचारलं मी, का चालते तू माझ्यासोबत.. सावलीने पण हसत उत्तर दिलं, कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.
भरू दे आकाश कितीही ढगांनी खऱ्या प्रेमापुढे ते ढग निवतील, लाख येऊ दे अडथळे, तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील.
वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते.. पण एवढं लक्षात ठेव, आज तू मला विसरलीस, उद्या तुला कोणीतरी विसरेल !
कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते.