2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस… दूर आपण झालो कधीचे, प्लीज़… आठवणींत भेटू नकोस… झालंय ब्रेकअप तरीही, डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस… खरेच सांगू का तुला, माझ्या मनात तू आता राहू नकोस…
थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय, पण धन्यवाद ! तू इथवर आलीस, सारे आयुष्य नसलीस तरी, चार पाऊले माझी झालीस…
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल, जर तू माझ्याशी प्रेम करशील तर, मी तुझ्या हृदयात असेल, अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर, मी तुझ्या मनात असेल…
जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही दुखावले जाता.. जेव्हा तुम्ही दुखावले जाता, तेव्हा तुम्ही द्वेष करता.. जेव्हा तुम्ही द्वेष करता, तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता.. जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मिस करायला लागता.. आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…
कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही…
अनेक जण भेटतात, खूप जण आपल्याला जवळ घेतात, आणि दुरावतातही, अनेक जण आपल्याला शब्द देतात, आणि विसरतातही, सुर्यास्तानंतर स्वतःची सावलीही दूर जाते, शेवटी आपण एकटेच असतो, आणि सोबत असतात फक्त आठवणी…
तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर… ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती…
ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे…
जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते…
तुझ्या अशा फसवणुकीने, मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास, ओळखीच्या माणसाशी देखील, आता तयार नसते बोलण्यास…
तुझ्या येण्याच्या चाहुलीने अजूनही तिथेच उभा राहतो, जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो…
माझ्यापासून दूरच जायचंय, तर खुशाल जा.. फक्त एवढंच लक्षात ठेव, पुन्हा मागे वळून बघायची मला पण सवय नाही…