2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जाता जाता ती सांगून गेली, काळजी घेत जा स्वतःची, पण तिचे डोळे सांगत होते की, आता माझी काळजी कोण घेणार…?
कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून, बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून…
प्रेम त्याच्यावर करा, ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे, कारण ह्रदय तुटण्याचे दुःख, त्याच्याइतके कुणालाच माहित नसते…
तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं, पण माझ्यासाठी खूप कठीण आहे, तुला विसरून जगणं…!!!
आज मला खूप रडावसं वाटतंय, स्वतःशी परत खूप भांडावंसं वाटतंय, भरलेल्या डोळ्याने… आरश्या समोर बसावसं वाटतंय, अन आपलं कोणीच नाही म्हणून, स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतंय…
जे मी केलं आणि का केलं, ते तुला कधीच समजणार नाही… आणि, समजू पण देणार नाही, पण जे काही केलं ते फक्त तुझ्यासाठीच केलं…
प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी.. हिशोब उरलाय तो फक्त, तू दिलेल्या जखमांचा…
जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत…
जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात…
“एखाद्या वळणावरती जुळलेले संबंध तुटण्याचा प्रसंग जरी आला तरी ते संबंध पूर्णपणे कधीच तोडू नका.. कारण, “अजून एखाद्या वळणावरती हे संबंध परत एकदा जोडण्याची गरज निर्माण झाली तर, निदान एकमेकांच्या मनात प्रवेश करायला थोडीशी जागा तरी असलीच पाहिजे”
जगात खूप गोष्टी आहेत, खेळण्यासाठी.. पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का, खेळण्यासाठी…
‘मन गुंतायला’ हि वेळ लागत नाही आणि, ‘मन तुटायला’ हि वेळ लागत नाही.. वेळ लागतो फक्त, ते गुंतलेले मन आवरायला आणि, ‘तुटलेले मन सावरायला’…