2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आठवणीत नाही ठेवलस तरी चालेलं पण..? विसरायचा प्रयत्न करु नको, तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी पण…? तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको.
मी अजूनही तुझी वाट पाहतोय.
कधी कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आलं तरी अश्रूंचं कारण होऊ नये.
आता मी तुझ्या जीवनातला महत्वाचा व्यक्ती नाही पण मी आशा व्यक्त करतो कि, एके दिवशी जेव्हा मी तुझ्या जीवनात नसेल तेव्हा माझी आठवण आल्यावर तू हळूच हसशील आणि म्हणशील नक्कीच तो इतरांपेक्षा चांगला होता.
कोणाची आठवण येणं कठीण नाही कठीण आहे ते म्हणजे मरेपर्यंत साथ देणे असे मोजकेच असतात तेच आयुष्यभर साथ देतात.
जगाची रीतच न्यारी आहे इथे सगळ्यांना आपली प्रितच प्यारी आहे मी म्हणत नाही शेवटपर्यंत साथ दे, पण शक्य आहे तोपर्यंत तरी माझा हातात हात घे.
प्रेमात एकदा खाल्ला धोका, आता प्रेमात पडायची इच्छाच नाही, आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय, आता परत रडायची इच्छाच नाही.
कुठेही रहा पण सुखात रहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःचा जीव जपत रहा, कारण जीव माझा तुझ्यात आहे.
मी तुला मिळवत असतांना, तु मला कुठेतरी गमावत होतीस, मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र, तु माझ्या नजरेतून उतरत होतीस.
नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो, जो हृदयात असतो तो नशिबात नसतो आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.
तुला जायचे होते तु गेलीस, मला गमवायचे होते मी गमावले, फरक फक्त एवढाच आहे की, तु आयुष्यातला एक क्षण गमावला, आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले.
खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.