2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
?“मैत्रीच्या पलिकडंही एक नातं असतं तिथं असतात भावना जाणून घेणारे सुख-दुख:त खांद्यावरती हात ठेवणारे भावनांना वाट मोकळी करून देणारे”
“रेशमी अनुबंध हे अन अबोल साऱ्या भावना… शब्दांत त्या मांडू कशी वेडया मना मज सांग ना…”
प्रेम असो वा नसो… भावना शुद्ध असाव्या लागतात…
आयुष्यात सगळ्यांना जीव लावून पाहिला… पण नंतर कळलं आई-वडिलांशिवाय कोणीच जीव लावू शकत नाही.
आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेऊ नका... कारण काही लोकांकडे आई नसते.. तर काही लोकांकडे जेवण
जगातील अनमोल गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपले ‘आईवडील’
मनातल जाणणारी ‘आई’ आणि भविष्य ओळखणारा ‘बाप’या शिवाय मोठा ज्योतिषी कोणीही नाही.
पालक शिकलेलो असोत किंवा नसोत. .. तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तेच योग्य मार्गदर्शक असतात.
आई-वडिलांचे प्रेम काही केल्या बदलत नाही. बाकी सगळ्यांचे प्रेम वेळेनुसार बदलते.
आई-बाबा… तुमच्या चेहऱ्यावरील हास्य तसेच राहू दे... आणि माझ्या जीवनात ते असेच राहू दे.
ओंजळीतील मायेची इथे कुणा किंमत कळत नाही, तिचं ते ओंजळीतलं देणं काही केल्या सरत नाही.
आत्मा आणि ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे ‘आई’