2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आनंद ही अशी गोष्ट नाही की, जी भविष्यासाठी राखून ठेऊ. ही अशी गोष्ट आहे, जी तुम्ही वर्तमानासाठी तयार केलेली असते
ज्याचा विचार केला ती गोष्ट प्राप्त होणं हे नक्कीच यश आहे. पण जे मिळालं त्यात समाधान मानणं हा आनंद आहे
प्रसन्नता हा असा पुरस्कार आहे, जो आपल्या समजूतदारपणाने योग्य आयुष्य जगल्यास प्राप्त होतो
आनंद दिल्याशिवाय त्याचा उपभोग घेण्याचा अधिकारी कोणालाच नाही
दुसरं कोणी काय म्हणत आहे, याकडे कधीही लक्ष देऊ नका. कारण असं केलंत तर आनंंद कधीच मिळणार नाही
आनंदाप्रमाणेच पैसाही प्रत्यक्ष स्वरूपात मिळत नाही. कोणत्यातरी चांगल्या सेवेच्या बदल्यात या दोन्ही गोष्टी मिळतात
मला वाटतं आनंद मिळवण्याची एक निश्चित पद्धत आहे की, आनंद हा कोणत्याही किमतीत प्राप्त करण्याची जिद्द असावी
तुमच्या विचारांवर तुमच्या आयुष्यातील आनंद अवलंबून असतो हे नेहमी लक्षात ठेवा
त्या लोकांबरोबर मैत्री नका करू ज्यांचा स्टेटस तुमच्यापेक्षा वरचढ अथवा खाली आहे. कारण अशी मैत्री तुम्हाला कधीच आनंद देणार नाही. मैत्री आपल्या विचारांशी बरोबरी असलेल्यांशी करा
आनंद हा स्वतःवर अवलंबून असतो
काही लोक जिथे जातात, तिथे आनंद वाटतात, तर काही लोक आयुष्यात निघून जातात तेव्हा आनंद येतो
तुम्ही कोण आहात, यावर तुमचा आनंद अवलंबून नाही, तुम्ही काय विचार करता यावर तुमचा आनंद सर्वस्वी अवलंबून आहे