2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. हॅपी बर्थडे
प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे हॅपी बर्थडे
तुझा वाढदिवस आहे खास कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास || Happy Birthday||
देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो.. रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय, तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.
केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे
तुझं आयुष्य ईमानदारीने जग, हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही, पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत. हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण. हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच. पण आमच्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक"सण" होऊ दे हीच सदिच्छा..!
Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे wish तर morning लाही करतात