2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.. शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे.. आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
पार्ट्या करा, खा, प्या नाच, गाणे, फटके फोडा पण वाढदिवसाच्या या पावन समयी मित्रांना हि वेळ द्या कि थोडा वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं… हीच शुभेच्छा!
भाषा प्रेमाची आज मला कळते आहे, नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे, दूर असूनही मन मनाशी जुळते आहे, आठवणीतही सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळते आहे…
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते…
आज तुझ्या आठवणींमध्ये रमुन रहावसे वाटते, तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावसे वाटते, किती छान झाले असते जर घड्याळाचे काटे माघे घेता आले असते, तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगता आले असते…
कधी तरी मन उदास होते, हळू हळू डोळ्यांना त्याची जाणीव होते, आपोआप पडतात डोळ्यांतून अश्रू, जेव्हा आपली माणसे दूर असल्याची जाणीव होते…
जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही दुखावले जाता.. जेव्हा तुम्ही दुखावले जाता, तेव्हा तुम्ही द्वेष करता.. जेव्हा तुम्ही द्वेष करता, तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता.. जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मिस करायला लागता.. आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता…
आठवण येणे आणि आठवण काढणे, यात खूप फरक आहे, आपण आठवण त्यांचीच काढतो, जे आपले आहेत… आणि आठवण त्यांनाच येते, जे तुम्हाला आपले समजतात…
दुरावा आहे पण, मन तर एकच आहे ना.. प्रत्यक्षात सोबत नाहीस, पण हृदयात तर तूच आहेस ना…
वाट तुझी पाहायची किती, कधी तुला कळणार? आयुष्य असे जगून, मी एकटाच किती झुरणार…?