2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
दोन क्षण थांब जरा, मला थोडं जगुन घेऊ दे, उद्याचं नाही नक्की काही हि, आजच तुला डोळे भरून बघून घेऊ दे.....miss u
वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील...
तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? वारा कसा मंद मंद वाहतो... मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? सरी कशा थेंब थेंब बरसतात... मनाला कशा चिंब चिंब भिजवतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ?? मोगरा ही गंध गंधित होतो... मनाला ही धुंद मोहरून नेतो ... तुझी आठवण आली की माहितेय काय होते ??? अश्रु ही कसे झर झर झरतात... तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात... तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? स्पंदनंचा ताल ताल हरवतो प्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतो तुझी आठवण आली की माहितेय काय होते??? माझे शब्द नी शब्द विखुरतात माझ्या कविता ही मजला ना स्फुरातात तुझी आठवण आली की माहितेय काय होते??
आठवणी किती विचित्र असतात ना..?? . . . सर्वसाधारण व्यक्ती नेहमी स्मितहास्य देऊन जातात.....तर.. प्रिय व्यक्ती नेहमी डोळ्यात अश्रु..... :'( तरि आपण प्रिय व्यक्तीचीच जास्त काळजी घेतो....!!
महिन्यातील प्रत्येक दिवसाला, दिवसातील प्रत्येक तासाला, तासाच्या प्रत्येक मिनिँटाला आठवण येते तुझी.... क्षणाक्षणाला .....
आठवणी मात्र येत असतात, मी अश्रू पुसत राहते.. जिथे असशील तीथे खूप सुःखी राहा, आणि मी तुझी वाट पाहत राहील.
छापा असोवा काटा असो....... नाणे खरे असावे लागते....... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी..... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...
घे बघून मला डोळे भरून, अन ठेव तुझ्या डोळ्यात साठवून रे मला.. जेव्हा कधी आल भरून मन, मिट डोळे, अन घे रे आठवून तू मला.... कितीही दूर असलो तरीही, खूप जवळ भासेन रे मी तुला... अन आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर, तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला... तुझ्या नकळतच, तुझ्या बरोबरच दिसेन रे मी तुला...
नाते जूऴते सहजपणे... नाते तुटते सहजपणे... पण, तुटल्यानंतर डोळ्यांतले थेंबही गळतात सहजपणे... मग आठवणी का जात नाहीत सहजपणे...? त्या का कोरल्या जातात नकळतपणे....?
तु मी सोबत असणे सारे काही विधिलिखित आहे.. रोज त्याच गर्दीत असून एकत्र कालांतराने भेटणे.. जवळ असूनही तू अन मी फक्त दूरवर जगत आहे.. आता प्रारब्धाच्या गोष्टी ह्या कसे, कुठे अन केव्हा समोर येणे.. पाहता क्षणीच एकमेकांचे होऊन जातो कसे.. कदाचित दैवी संकेतच मिळत असतील असे.. खेळ सारा भावनांचा होतो अन ओढ कसली कुणास न दिसे..
जगाच्या गर्दीत कुणीतरी आपले वाटावं.. आपले असे कुणी अवचित समोर यावं.. झंकारून तारा मनाच्या आज पावसाने बरसावं.. खरच आज असे कुणी मला हि खास भेटावं..
एक बाकी एकाकी, एक अंत एकांत .. एक अडके एकात, एक एकटया जगात ... एक खिडकी एक वारा, एक चन्द्र एक तारा ... एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच......