2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
असंख्य विचारांचे काळे ढग मनात माझ्या गर्दी करू लागलेत... अश्रूनरुपी थेंबावाटे अलगदते गालावरून बरसू हि लागलेत... काळ्या ढगांच सावट ते अजून दूर काही झाल नाही... निळ्याशार स्वच्छंदी आकाशाचं दर्शन काही अजून होत नाही... वाट पाहतेय मी त्या प्रखर अशा सूर्य किरणांची अंधारमय मनाला तेजोमय प्रकाशाने उजळवून देण्याची...!!
आले आता एक असे वळण नको असलेलं.. तुझ्या आयुष्यात माझे स्थान ओझरत चाललेलं विरह, दुख, यातना हेच सोबती सांगाती आपले उरलेले.. एक एक क्षण डोळ्यात दाटून अश्रू बनून गालावर ओघळले..
जागेपणी प्रखर जिची आठवण येते झोपेतही माझ्या ती स्वप्नांमद्दे येते ! मिटलेल्या ओठांनी ती वाऱ्यासवे गाते झुकलेल्या नेत्रांनी प्रेमाची तर छेडते गालावरील लाली पुन्हा पुसून घेते मला पहातच ती पुन्हा पुन्हा लाजते..
वेळ लागला तरी चालेल... पण वाट तुझीच पाहीन... विसरलास तू मला तरीही... नेहमी मी तुझीच राहील....
आज मी तिला खूप miss करतोय कुठे हरवली काय माहित आज मी स्वतः स्वताशीच बोलतोय जायचं तर सांगून तरी जायचं होत अनोळखी चेहऱ्यात तिलाच शोधत बसलोय आज मी तिला खूप miss करतोय आली कि नुसती बडबड आज जणू शांतता पसरलीय कुठे गेली रे ही.. तिला खूप miss करतोय येईल या आशेवर आज मी इथेच बसून राहणार तहान भूक मेलीय माझी तिला कधी कळणार आज कसं वेगळंच वाटतंय रोजच्या गर्दीपासून अलग झाल्यासारखं वाटतंय कुठे गेली रे ही.. तिला खूप miss करतोय लवकर ये ग मी वाट पाहतोय..
जिथे श्वासात श्वास गुंततात तेच क्षण आपले असतात.... तू नसलास आता तरी.. तेच क्षण मला आजही आठवतात ...
तुझी वाट पाहताना दिवस संपतात... पण वाट पाहणं संपत नाही... आयुष्यावरील तुझी छाप पुसून टाकणं... मला अजूनही जमत नाही.... का तुझा सहवास दरवळत राहतो आजही..?? का खोलवर झालेल्या जखमा बुझता बुझाता.., पुन्हा वाहायला लागतात... ? का ती वेदना नको असतानाही हवीशी वाटत राहते
तुझ्या प्रेमाने रडवलं आहे खुप, तुझ्या आठवणीने मला तर सावरल आहे खुप.. मी तुझ्यावर जिवा- पाडप्रेम करत होतो, माझ्या या मजबुरीला तू आजमावलं आहे खुप.. दिली आहेसच तू मला प्रेम भंगाची जखम, मग कशाला हवे आहे तुझ्या आठवणींचे मलम.. या धक्क्यातून सावरावं लागणार आहे निश्चित, आता तुला विसरणं हेच आहे माझ्या प्रेमाचे प्रायश्चित्त..
तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला...
तुझ्या आठवणीना पडद्याआड करण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रत्येक प्रयत्न शेवटी अयशस्वीच ठरला, वाटले होते आता तुला सहजपणे विसरू शकेन, पण शेवटी तुझ्या आठवणीत माझा प्रत्येक अश्रू कोरडाच राहिला....
तुझ्याशिवाय आता, मन कुठेच लागत नाही..... तुझ्याशिवाय आता, मी काहीच मागत नाही..... शोधतो बहाणे तुझ्याशी बोलायचे, माझे इशारे तुला जरा देखील कळत नाही..... का करतो मी असे वेड्यासारखा, माझे वागणे तुला जरा देखील समजत नाही..... आधीन झालोय गं मी तुझा, तुझं व्यसन काही केल्या सुटत नाही..... नेहमी तुझाच विचार करत असतो, माझे वाहणारे तुला कसे दिसत नाही..... फिरत असतो सैरभैर आठवणीत तुझ्या, तु शोधुनही मला सापडत नाही..... आता नाहीच सहन होत, मला एक क्षणही दुरावा तुझा..... काय करु काय सांगु मी तुला, तुझ्याशिवाय मला खरं तर करमत नाही...
मनाचे भाव असतात साधे भोळे...., तुझी आठवण येताच भरतात डोळे......