Status in Marathi

2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook

New Alone Angry Attitude Birthday Breakup Brothers Cheat Crush Emotional Festivals Friends Funny Good Morning Gym Happiness Heart Touching Independence Day International Friendship Day Life Love Mahakal Miss U Motivational Rain Sad Selfish Single Sisters Sorry Thanks
 

आपण वेळीच सावरलं पाहिजे, आपण जिथे चुकत असू जिथे खचत असू तिथून शक्य तितक्या योग्य वेळी आपण सावरलं पाहिजे. सहसा आपलं सावरणं भविष्यातील आपल्या व्यक्तीमत्वाची पुर्ण प्रतिमा उभं करत असतं, आपल्याला एकेका अडथळ्यातून सावरायला जो वेळ आधी सहा महिन्यांचा लागत असेल पुढे तो एक महिन्यावर येतो, नंतर एका आठवड्यावर नंतर फार फार तर दोन तीन दिवसात तुम्ही स्वत:च नव्याने सज्ज व्हायला लागता. पण त्याकरता प्रथम वेळी नीटपणे सावरणं महत्वाचं आहे.

किरण पवार (अंशु)

अनेकदा आपण शक्यतांचा आधार घेत पुर्व अंदाजानुसार आपले ध्येयातील टप्पे ठरवत असतो, दरवेळी त्या टप्प्यांच्या हिशोबतच गोष्टी होतील अशातला भाग नाही. कधी एखादा टप्पा फार तीव्र स्वरूपाची कठीणाई निर्माण करू शकतो, त्यात मानसिक खच्चीकरण होऊ शकतं पण म्हणून कधी स्वत:च्या चालू वाटचालीवर शंका घेत ध्येयाबद्दल डगमगू नका.

किरण पवार (अंशु)

तुमच्या मनातले आणि खरतरं तुमच्या स्वत:चे तुमच्याच विरूद्ध चालणारे अनेक संघर्ष तुमच्या वाट्याला येत असतात. त्यात द्विधा प्रश्नांवर मन खोळंबत, कधी निर्णय लवकर घेता येत नाही, कधी उगाच हरवून गेल्यासारखं वाटतं आणि तसचं राहवं वाटतं, वास्तविकताच नकोशी वाटते; मुळात हा संघर्ष असतो तो स्वत: विरूद्धचं पण त्याबाबतीत कधीच कोणी काहीही शिकवत नाही, कधी कोणी आपल्याला त्याविषयी सल्ले वा माहितीही देत नाही त्यामुळे अशा संघर्षांना थोडं सामंजस्य बाळगत हळूवारपणे सामोरं जाण्याचा प्रयत्न करत चला.

किरण पवार (अंशु)

अंतर्गत कलहात अडकुण राहू नका. भलेही ते कुटुंबातील आई-बाबा वा इतर नात्यांशी निगडीत असतील, इतर कोणत्याही दोन नात्यांमधील असतील अशा कलहांमधून वेळीच स्वत:ची सुटका करा, कलहांच्या जाणिवेत अडकुन राहिल्याने तुमची पुढील पाऊले सकारात्मक ऊर्जेने पडू शकत नाहीत.

किरण पवार (अंशु)

अनेकदा तुम्ही करत आलेल्या गोष्टी, कामे, तुमच्या अंतर्गत असलेली कौशल्ये यांच्यामुळे सभोवताली वावरणाऱ्या इतर लोकांच्या नजरेत तुमची सिद्धता स्पष्ट करत असता अशावेळी लोकांकडून अनेकदा तुमच्याकडून प्रचंड आशा अपेक्षा विविध रूपात वाढू लागतात आणि कधीकधी तुम्हाला एखाद्या नैराश्याच्या क्षणी हे अपेक्षांच गणितचं स्वत:ला खाऊन टाकेल असं वाटू लागतं. तेव्हा स्वत:च्या मानसिकतेला स्थैर्य देण्याकरता अपेक्षांच्या गणिताचा फारसा विचार न करता चालत रहा.

किरण पवार (अंशु)

यशासाठी एकेक पायरी महत्वाची असते याचा अर्थ असा की तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाणारं छोट्यातलं छोटं ज्ञान/कोशल्य देखील महत्वाचं असतं. हे अगदीच सोप्पंय, मी सहज करून देईन हा अॅटिट्युड तिथे बाजुला ठेवून प्रत्येक पायरीशी समर्पकरित्या जुळवून घेण्याची क्षमता ठेवता आली पाहिजे.

किरण पवार (अंशु)

आपल्या अंतरंगात कधीतरी क्रोधाची भावना निर्माण होणं हे नैसर्गिक आहे. पण आपल्यामधे एखाद्याबद्दल कटुता वा अगदीच तीव्र तऱ्हेची द्वेषाची ठिणखी कधीच पेटू नये. कारण या नकारात्मक गोष्टींनी आपणच आपल्यातलं असलेलं कौशल्य, आपलं चैतन्य, आपल्यातील तजेलदारपणा हे नकळतपणे नष्ट करत असतो. त्यामुळे अगदीच इतरांबद्दल सहसा वाईट तर नकोच पण विचारही न करता आपला मार्ग दवडत रहायचा इतकचं!

किरण पवार (अंशु)

तुमची खरी सचोटी राग/क्रोधाला शांत करण्यासाठी लागते. भलेही प्रसंग कसाही असो कितीही बाका असो तडकाफडकी केलेली गोष्ट वा घेतलेला निर्णय नंतर आयुष्यभराची उणीव म्हणून भासू लागतो. त्यामुळे असं काही होऊ देण्यापेक्षा सचोटीने आपल्यावर ताबा ठेवत गोष्टींना सामोरे जात चला.

किरण पवार (अंशु)

आजच्या स्पर्धात्मक युगात अनेकदा "झोपेसारख्या" गंभीर मुद्याची टिंगल वगैरे केल्या जाते, अनेकदा जो झोपून राहिलं तो संपूनच जाईल किंवा इतरही अनेक विचार लिहले जातात परंतु मुख्य गोष्ट अशी की मानवी "मेंदू-ह्रदय" यांचा समन्वय योग्य राहण्यासाठी किमान ७ तासांपेक्षा अधिक काळ झोप आवश्यक असते. मेंदू हा एक प्रकारचा कॉम्प्युटर आहे ज्याला काम तल्लखपणे करायला उर्जेची गरज लागते आणि ही उर्जी पुर्ण झोपेशिवाय मिळू शकत नाही. झोपेमोड होत राहणं, झोप न लागणं याने ह्रदयविकार व इतर अडचणी होतात मन शांत राहत नाहीत. त्यामुळे योग्य गोष्टींसाठी पुरेशी झोप घ्या व सकारात्मक प्रभावाने वाटचाल करत रहा.

किरण पवार (अंशु)

नैराश्य अनेक कारणांनी तुमच्याकडे कधी अचानकपणे येऊन जाईल याची माहिती देता येत नाही. कधीकधी आयुष्यात सारकाही आलबेल सुरू असलं तरी नैराश्य आल्याची भावना मनावर ताबा घेऊ शकते त्यामुळे सहसा स्वत:च्या मनाला रोज जगताना धाडसाचा आणि सकारात्मक बदलांचा पाडा शिकवत चला. जेणेकरून नकारात्मकतेला तुमच्याजवळ यायला वाव नाही मिळाला पाहिजे.

किरण पवार (अंशु)

तुम्ही अनेकदा वेळेला बांधिल असता, तुम्ही ठरवलेलं असतं, तुम्ही त्या त्या कालावधीत त्या त्या गोष्टींची आखणी केलेली असते आणि टप्प्याने तुम्ही ती पार पाडतही असता; अशातच मधे एखादी घटना घडते आणि तुमचा स्वत:वरच वैताग सुरू होतो... अशात तुम्ही आधी गेलेल्या वेळेपेक्षा पश्चाताप करण्यात अधिक वेळ घालवल्याने गोष्टी आणखीच बिघडतात त्यामुळे एखादी गोष्ट जरी हुकली तरी मनाची तयारी अशी करा की त्यापुढे जे कलायचंयं त्याच नियोजन करता आलं पाहिजे, संयम राखता यावा इतकचं.

किरण पवार (अंशु)

तुमचा स्थायिभाव जरी अगदी निश्चल, शांत असला तरी कधीकधी काही व्यक्तींसमोर तुम्हाला कठोर बननं भाग पडतं, त्यामुळे वेळ आल्यावर किंवा प्रसंग फारच बाका आला तर तुमच्यातला खडतरपणा इतरांना दिसला पाहिजे, तो जर दिसला नाही तर इतर व्यक्ती तुम्हाला सहज त्यांच्या प्रभावाखाली आणू शकतात.

किरण पवार (अंशु)