2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोड घास म्हणजे मैत्री. एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.
मैत्री करत असाल तर दिव्यातल्या पणती सारखी करा.. अंधारात जे प्रकाश देईल हृदयात असं एक मंदीर करा..
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे. जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे..
सागराचे पाणी कधी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही, एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो. अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो. ज्यांना कधी ओळखतही नसतो. त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो..
निर्सगाला रंग हवा असतो. फुलांना गंध हवा असतो. माणुस हा एकटा कसा राहणार, कारण त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा sमैत्री एक अनमोल भेट जीवनाची, मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा, मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.
मैत्री करत असाल तर चंद्र तारे यां सारखी अतूट करा.. ओंजळीत घेवून सुद्धा आकाशात न मावेल अशी करा..
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते. फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल, आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.
मैञीला नसतात शब्दांची बंधने, त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने, मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात, पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.
जीवनात दोनच मित्र कमवा… एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल..
काही शब्द नकळत कानावर पडतात कोणी दूर असुनही उगाच जवळ वाटतात खर तर ही मैञीची नाती अशीच असतात आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात.